गडचिराेलीची दारूबंदी अधिक मजबूत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:59+5:302021-06-27T04:23:59+5:30
निवेदनात म्हटले आहे की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने राज्य करता. शिवरायांनी जनतेला दारू पाजली असती का? मग ...
निवेदनात म्हटले आहे की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने राज्य करता. शिवरायांनी जनतेला दारू पाजली असती का? मग आपण चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारूबंदी का? उठविली? आपले मंत्री गडचिरोली जिल्ह्यात येऊन येथील यशस्वी दारूबंदी उठविण्याची धमकी देऊन का? जातात? ही शिवशाही की दारूशाही ? असाही सवाल तालुक्यातील ६४ गावांनी उपस्थित केला आहे, असे मुक्तिपथने म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी आहे. गावा-गावांत महिला संघटना आहेत व त्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याच्या बहुतेक गावांत दारूबंदी चांगल्या रीतीने लागू आहे. मात्र, शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठविण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात शासनाने दारू सुरू करू नये, तर दारूबंदी मजबूत केली पाहिजे असे आम्हाला वाटते. चंद्रपूरमध्ये जर दारूविक्री सुरू झाली, तर गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू येऊन त्याचा उलट परिणाम होईल. जिल्ह्याच्या सीमेवर दुकाने सुरू होतील. गडचिरोली जिल्ह्याच्या प्रभावी दारूबंदीला धक्का बसेल. महिलांवर हा मोठा अन्याय होईल. चंद्रपूरच्या दारूविक्रेत्यांची घरे भरतील; पण आमचे संसार नष्ट होतील.
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी कायम राहावी, गडचिरोली व चंद्रपूर दोन्ही जिल्ह्यांतील दारूबंदीची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात यावी. अवैध दारूचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाच्या आवश्यक विभागांना जबाबदारी देण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यातून कोणतीही अवैध दारू गडचिरोली जिल्ह्यात येणार नाही, याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशीही मागणी तालुक्यातील महिलांनी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी शिष्टमंडळात तालुक्यातील अनेक महिलांचा सहभाग होता.