जंकासचे बळकटीकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:16 AM2017-07-20T02:16:13+5:302017-07-20T02:16:13+5:30
आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थांच्या सभासदांना जास्तीत जास्त रोजगार मिळून संस्थांना ऊर्जितावस्था
सभासदांना साहित्य वितरण : अधिदान कार्यक्रमात मुख्य वनसंरक्षकांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थांच्या सभासदांना जास्तीत जास्त रोजगार मिळून संस्थांना ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी वनविभागाच्या वतीने सकारात्मक धोरण राबविल्या जाईल असे प्रतिपादन गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक डब्लू. एस. एटबॉन यांनी केले.
जंगल कामगार सहकारी संस्था जांभळी, महावाडा, सालेभट्टी यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जुलै रोजी पोटेगांव मार्गावरील गोंडवाना कला दालनमध्ये १० टक्के समाजकल्याण अधिदान वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख वितरक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाचे अध्यक्ष माजी खा. मारोतराव कोवासे होते. प्रमुख वितरक म्हणून गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक फुले, प्रमुख अतिथी म्हणून राज्य जंगल कामगार सहकारी संघाचे उपाध्यक्ष माजी आ. हरिराम वरखडे, जिल्हा संघाचे उपाध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम, सहाय्यक वनसंरक्षक ए. आर. पऱ्हाड, सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक नितीन म्हस्के, महावाडा संस्थेचे अध्यक्ष नागोराव गावळे, उपाध्यक्ष सुकराम उसेंडी, जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाचे सचिव एम. डी. मेश्राम, जांभळी संस्थेचे अध्यक्ष शालीकराव कुमरे, उपाध्यक्ष हरीदास नैताम, सालेभट्टी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण जाळे, उपाध्यक्ष अंबरशाह सिडाम व पदाधिकारी उपस्थित होते.
माजी खा. मारोतराव कोवासे म्हणाले, जिल्हा जंगल कामगार सहकारी संस्थांच्या वतीने १० टक्के समाजकल्याण अधिदान रकमेतून संस्थांच्या कार्यक्षेत्रातील एका गावामध्ये वाचनालयाची सुविधा निर्माण केली जाणार आहे. १० टक्के समाजकल्याण अधिदान निधीतून सभासदांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहे.
माजी आ. हरिराम वरखडे यांनी सस्थांच्या माध्यमातून विविध व्यवसायाला चालना देण्याची गरज असल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते सभासदांना विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक महावाडा संस्थेचे सचिव डी. डी. मेश्राम, संचालन अनखोडा संस्थेचे सचिव ढोरे तर आभार जांभळी संस्थेचे सचिव प्रकाश झाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र वाल्को, रमेश उसेंडी, पोहाणे, गुरूदेव आंदे, पिपरे, नेवारे, हलामी, अ. न. काळबांधे, सुरपाम, सराटे, कालिदास हलामी यांच्यासह जांभळी, महावाडा, सालेभट्टी संस्थांचे संचालक मंडळ व संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.