प्रशासनाशी नाते घट्ट करा
By admin | Published: October 28, 2015 01:37 AM2015-10-28T01:37:38+5:302015-10-28T01:37:38+5:30
व्यक्ती, कुटुंब, समाज व जिल्ह्यासह राज्याचा विकास गतीने होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे प्रशासनाशी असलेले नाते वाढणे गरजेचे आहे.
देवलमारीत जनजागरण मेळावा : संजय मोरे यांचे नागरिकांना आवाहन
अहेरी : व्यक्ती, कुटुंब, समाज व जिल्ह्यासह राज्याचा विकास गतीने होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे प्रशासनाशी असलेले नाते वाढणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी नागरिकांनी प्रशासनाशी असलेले आपले नाते व संपर्क घट्ट करावे, असे आवाहन अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले.
जिल्हा प्रशासन व अहेरी पोलीस ठाण्याच्या वतीने अहेरी तालुक्यातील देवलमारी येथे मंगळवारी आयोजित जनजागण मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी वाय. जी. पदा, देवलमारीच्या सरपंच पेंटूबाई पोरतेट, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बायक्का तुम्मावार, शाळेचे मुख्याध्यापक कल्याणम, केंद्रप्रमुख उमाकांत शेंडे, के. जी. बी. व्ही. शाळेच्या मुख्याध्यापिका डी. वाय. ढवस, बुच्चा आत्राम, रिहिमा सिद्धीकी, सुशीला भगत, सरिता पांढूरवार, डॉ. विशाल येर्रावार, रंगय्या रेपाकवार आदी उपस्थित होते.
जनजागरण मेळाव्यातून प्रशासन व नागरिक यांच्यातील दुरावा कमी होण्यास मदत होत आहे. तसेच नागरिकांच्या माहिती ज्ञानात भर पडत आहे, असे पोलीस निरीक्षक मोरे यावेळी म्हणाले. याप्रसंगी पोलीस, कृषी, आरोग्य व इतर विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक अहेरीचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे, संचालन डॉ. नीलिमा सिंह यांनी तर आभार पोलीस निरीक्षक किरण दीडवाघ यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)