औषध निर्माण अधिकाऱ्यांवर ताण; पी फाॅर्म भरण्याची सक्ती मागे घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 05:00 AM2021-10-10T05:00:00+5:302021-10-10T05:00:44+5:30

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आदींना वैद्यकीय अधीक्षकांकडून औषध निर्माण अधिकाऱ्यांना आय.एच.आय.पी. मधील पी फाॅर्म भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आधीच कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा व अतिरिक्त कामांमुळेही सक्तीची दिली जाणारी जबाबदारी अन्यायपूर्ण आहे.  पी फाॅर्ममध्ये दाखल रुग्णांचा तपशील, डेथ रेकाॅर्ड, रेकाॅर्ड ॲग्रिमेंट डाटा असे ३ प्रकारचे फाॅर्म भरायचे आहेत.

Stress on drug manufacturing officers; The compulsion to fill up the P form should be withdrawn | औषध निर्माण अधिकाऱ्यांवर ताण; पी फाॅर्म भरण्याची सक्ती मागे घ्यावी

औषध निर्माण अधिकाऱ्यांवर ताण; पी फाॅर्म भरण्याची सक्ती मागे घ्यावी

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : केंद्र शासनाच्या आराेग्य विभागाच्या संकेतस्थळावर पी फाॅर्म भरण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आहे, असे स्पष्ट नमूद आहे. तशा मार्गदर्शक सूचना दिलेल्या असतानाही औषधी निर्माण अधिकाऱ्यांनी सदर फाॅर्म भरावा, अशी सूचनावजा सक्ती करणे ही बाब याेग्य नाही. हे काम लवकर थांबवावे, असे पत्र शासकीय औषध निर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटनेने राज्य शासनाचे आराेग्य संचालक व इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सादर केेले आहे.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आदींना वैद्यकीय अधीक्षकांकडून औषध निर्माण अधिकाऱ्यांना आय.एच.आय.पी. मधील पी फाॅर्म भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आधीच कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा व अतिरिक्त कामांमुळेही सक्तीची दिली जाणारी जबाबदारी अन्यायपूर्ण आहे.  पी फाॅर्ममध्ये दाखल रुग्णांचा तपशील, डेथ रेकाॅर्ड, रेकाॅर्ड ॲग्रिमेंट डाटा असे ३ प्रकारचे फाॅर्म भरायचे आहेत. साेबत रुग्णांचे नाव, माेबाईल क्रमांक, जन्म तारीख, जन्मखूण, पत्ता, ओळखपत्राचा नंबर, राेगनिदान प्रयाेगशाळेच्या तपासण्या अशी बरीच माहिती ऑनलाईन/ऑफलाईन भरायची आहे.
औषधी निर्माण अधिकाऱ्यांना रुग्णाच्या आजाराचे निदान किंवा उपचाराचे कुठलेही ज्ञान नसतानाही आयएचआयपी मधील पी फाॅर्म भरण्याची सक्ती करण्याचे प्रयाेजन काय? असा प्रश्न संघटनेने उपस्थित केेला आहे. पी फाॅर्म मध्ये एकूण ३३ आजारांची अचूक माहिती भरायची असलयाने हा फाॅर्म वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे भरला जाणे गरजेचे आहे. 
दैनिक कामे सांभाळून पी फाॅर्म भरण्यासाठी अतिरिक्त वेळ काढणे अशक्य आहे. त्यामुळे सदर जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी औषध निर्माण अधिकारी गट ‘क’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश देशमुख, सचिव राकेश गरपल्लीवार यांनी आराेग्य सेवा संचालक पुणे, उपसंचालक आराेग्य सेवा नागपूर, जिल्हा शल्य चिकित्सक गडचिराेली, जिल्हा आराेग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरराेज अतिरिक्त १५ तास लागणार
-    पी फाॅर्म भरताना आराेग्य पर्यवेक्षक किंवा आराेग्य सहायक यांनी पी फाॅर्म भरण्यासाठी औषध निर्माण अधिकारी यांना मदत करायची आहे; परंतु आराेग्य पर्यवेक्षक किंवा आराेग्य सहाय यांची पदे रिक्त आहेत किंवा कार्यरत नाहीत. एका रुग्णाची पी फाॅर्ममध्ये ऑनलाईन/ऑफलाईन माहिती भरण्यासाठी साधारणत: ३ मिनिटे लागतात. जिल्हा रुग्णालय व अधिनस्त महिला व बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात दरराेज सरासरीने ३०० ते ५०० रुग्ण उपचार घेतात. या सर्वांची माहिती भरण्यासाठी १४ ते १५ तास लागतात.

अनेक रुग्णालयातील पदे रिक्त; नवीन जबाबदारी कशी पेलणार? 
औषध निर्माण अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील रुग्णालयांना मागणीनुसार औषधींचे वाटप, औषधी व्यवस्थापन, औषधांच्या जमाखर्चाची नाेंद, मुदतबाह्य औषधांची नाेंद ऑक्सिजन सिलिंडरचा वेळेवर पुरवठा, शिल्लक साठ्याची नाेंद, आदी कामे करावी लागतात. याशिवाय ग्रामीण रुग्णालय आष्टी, धानाेरा व सिराेंचा येथे औषध निर्माण अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा अतिरिक्त व्याप वाढलेला असताना ही अतिरिक्त नवीन जबाबदारी कशी पेलणार, असा सवाल संघटनेने केला आहे.

 

Web Title: Stress on drug manufacturing officers; The compulsion to fill up the P form should be withdrawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं