अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:34 AM2021-02-12T04:34:51+5:302021-02-12T04:34:51+5:30

गडचिरोली : आपल्या देशात रस्त्याच्या लांबीबरोबर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; पण त्यामानाने लोकांकडून आवश्यक प्रमाणात रस्ता ...

Strict adherence to road safety rules is essential to prevent accidents | अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

Next

गडचिरोली : आपल्या देशात रस्त्याच्या लांबीबरोबर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; पण त्यामानाने लोकांकडून आवश्यक प्रमाणात रस्ता सुरक्षा नियमांचे पालन होताना दिसत नाही. पर्यायाने दरवर्षी ५ लाख लोकांचे अपघात रस्त्यावर घडतात. त्यापैकी दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागते, ही बाब चिंताजनक आहे. म्हणून अपघात विरहित जीवनासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले.

गडचिराेली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संस्थेच्या परिसरात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके होते. याप्रसंगी नॕॅशनल हायवे ऑथाेरिटीचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, शाखा अभियंता आशिष आवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, जिल्हा वाहतूक शाखेच्या गोरे, माेटार वाहन निरीक्षक शफिक उचगावकर, चेतन पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू कावळे आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विवेक मिश्रा आणि शफीक उचगावकर यांनी रस्ते नियम आणि नागरिकांची जबाबदारी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रासेयाे कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम, सूत्रसंचालन संतोष बोंद्रे तर आभार विवेक गढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिदेशक तसेच कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Strict adherence to road safety rules is essential to prevent accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.