दुसऱ्याही दिवशी कडक लाॅकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 05:00 AM2021-04-12T05:00:00+5:302021-04-12T05:00:27+5:30

लाॅकडाऊनसाठी शहरात किंवा चाैकात काेणताही पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला नव्हता. तरीही नागरिक स्वत:हून घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते. जिल्ह्यात दरदिवशी बाधित काेराेना रूग्णांच्या संख्येत रेकाॅर्डब्रेक वाढ हाेत आहे. वाढलेले बहुतांश रूग्ण गडचिराेली शहरातील आहेत. त्यामुळे गडचिराेली शहरातील नागरिकांमध्ये काेराेनाविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Strict lockdown the next day | दुसऱ्याही दिवशी कडक लाॅकडाऊन

दुसऱ्याही दिवशी कडक लाॅकडाऊन

Next
ठळक मुद्देशहरे व तालुकास्तरावरील दुकाने बंद; काही ठिकाणी पाेलिसांनी ठेवला हाेता चाेख बंदाेबस्त

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : लाॅकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही गडचिराेली शहरासह जिल्हाभरातील बाजारपेठ व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले हाेते. लाॅकडाऊनला नागरिकांनी स्वत:हून प्रतिसाद दर्शविला. 
गडचिराेली : लाॅकडाऊनचा पहिला दिवस शनिवार हाेता. काही दुकानदार व विक्रेते यांचा लाॅकडाऊनला विराेध असल्याने काही प्रमाणात दुकाने उघडली जातील, अशी शक्यता हाेती. मात्र एकाही दुकानदाराने दुकान उघडले नाही. एवढेच नाही तर गडचिराेली शहरातील दैनंदिन गुजरीसुद्धा बंद हाेती. शनिवार प्रमाणेच रविवारीसुद्धा लाॅकडाऊनचे कडक पालन करण्यात आले. 
विशेष म्हणजे, लाॅकडाऊनसाठी शहरात किंवा चाैकात काेणताही पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला नव्हता. तरीही नागरिक स्वत:हून घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते. जिल्ह्यात दरदिवशी बाधित काेराेना रूग्णांच्या संख्येत रेकाॅर्डब्रेक वाढ हाेत आहे. वाढलेले बहुतांश रूग्ण गडचिराेली शहरातील आहेत. त्यामुळे गडचिराेली शहरातील नागरिकांमध्ये काेराेनाविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी शासकीय कार्यालये बंद हाेती. बाजारपेठही बंद असल्याने घराबाहेर पडण्याचे काेणतेच कारण नसल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. दिवसभर गडचिराेली शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले हाेते. सायंकाळच्या सुमारास काही प्रमाणात वाहनांची संख्या वाढली. 

आष्टी : वीकेंडच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा आष्टी येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली हाेती. बसस्थानकावर माेजकेच प्रवासी दिसून येत हाेते. चंद्रपूर, गडचिराेलीसाठी काही निवडक बसफेऱ्या सुरू हाेत्या. त्यामुळे प्रवाशांना वाट पहावी लागत हाेती. पाेलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांच्या नेतृत्वात पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पाेलिसांमार्फत हटकले जात हाेते. 

कुरखेडा : येथील बाजारपेठ सलग दुसऱ्या दिवशी रविवारी सुध्दा बंद ठेवण्यात आली हाेती. केवळ औषधी दुकाने सुरू हाेती.

एटापल्ली : एटापल्ली शहरातील मेडिकल वगळता सर्वच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली हाेती.

चामाेर्शी : लाॅकडाऊन असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक चामाेर्शी शहरात दाखल झाले नाही. त्यामुळे शहराच्या बाजारपेठेतील रस्ते ओस पडले हाेते. आपल्या वाॅर्डात कामानिमित्त नागरिक बाहेर पडत असले तरी मुख्य रस्ता व बाजारपेठेकडे जाण्यास धजावत नव्हते. काही माेजक्या बसफेऱ्या सुरू हाेत्या. 

आलापल्ली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरातील बाजारपेठ रविववारी सुध्दा बंद हाेती. मेडीकल स्टाेअर्स व खासगी दवाखाने केवळ सुरू हाेते. रविवार असल्याने अनेकांनी चिकन मटनसाठी मार्केटमध्ये सकाळीच धाव घेतली. मात्र चिकन मार्केट बंद हाेती. दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. शनिवारीच बाजारपेठ बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिक रविवारी सुध्दा आलापल्ली येथे आले नाहीत.

एसटीच्या तुरळक फेऱ्या, तर खासगी वाहतूक सेवा ठप्प
शनिवारचा अनुभव लक्षात घेऊन एसटीने मुख्य मार्गावर काही बसफेऱ्यांचे नियाेजन केले हाेते. त्यामुळे बसस्थानकावर पाेहाेचलेल्या प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागत हाेती. दाेन ते तीन तासाच्या अंतराने मुख्य मार्गांवर बसफेऱ्या साेडल्या जात हाेत्या. बसला खासगी वाहतूक हा पर्याय आहे. मात्र खासगी वाहतूकही बंद असल्याने एसटीची वाट पाहिल्याशिवाय प्रवाशांसमाेर दुसरा पर्याय उरला नव्हता. दुर्गम भागातील बसफेऱ्या तर पूर्णपणे बंद हाेत्या.  साेमवारपासून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याने एसटीलाही काही प्रमाणात प्रवाशी मिळतील, अशी अपेक्षा आहे.

देसाईगंज : देसाईगंज हे जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. मुख्याधिकारी व पाेलीस विभागाने वीकेंड लाॅकडाऊनला यशस्वी करण्याचे आवाहन जनतेला केले हाेते. त्यामुळे शनिवारी शहरातील मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. बाजारपेठेतील रस्त्यांवर नेहमी वर्दळ राहते. लाॅकडाऊनमुळे रस्ते ओस पडले हाेते. 

आरमाेरी : आरमाेरीत मागील चार दिवसांपासूनच दुकाने  बंद ठेवली जात आहेत. लाॅकडाऊनच्या दाेन्ही दिवशी दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. आरमाेरी शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे या महामार्गावरून देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागपूर, गडचिराेली व ग्रामीण भागासाठी अनेक प्रवासी व मालवाहू वाहने रात्रंदिवस धावत राहतात. मात्र शनिवारपासून ही वाहने पूर्णपणे ठप्प पडली आहेत. रस्ते सुनसान झाले आहेत. 

काेरची : ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांमुळे काेरचीतील बाजारपेठ नेहमी फुलून राहते. मात्र लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिक काेरचीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे रस्ते ओस पडले हाेते. औषधीची दुकाने वगळता पानठेले, चहाटपऱ्या, फळविक्रीसह इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. 

धानाेरा : धानाेरा येथील बाजारपेठ सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली हाेती. औषधी दुकाने, पेट्राेलपंप वगळता इतर सर्वच दुकाने बंद हाेती. 

 

Web Title: Strict lockdown the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.