काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:36 PM2018-04-16T23:36:17+5:302018-04-16T23:36:37+5:30

‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’, ‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उंदरं’ आदी सरकारीविरोधी घोषणा देत युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ एप्रिल रोजी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार, शेतकरी व युवक सहभागी झाले होते.

Strike of Bailbandi Morcha of Congress | काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाची धडक

काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाची धडक

Next
ठळक मुद्देघोषणांनी दुमदुमला आसमंत : ‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ‘मायबाप म्हणतात अभ्यास कर, मोदी म्हणतात पकोडे तळ’, ‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उंदरं’ आदी सरकारीविरोधी घोषणा देत युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ एप्रिल रोजी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार, शेतकरी व युवक सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, धानाला प्रती क्विंटल ४ हजार ५००, कापसाला १० हजार, सोयाबिनला आठ हजार रूपये प्रमाणे भाव द्यावा, वनसंवर्धन कायद्यामुळे रखडलेले तुलतुली, कारवाफा, चेन्ना, पिपरी रिठ, डुरकानगुड्रा, कळमगाव आदी सिंचन प्रकल्पांना मंजुरी देऊन काम करावे, गरीब, शेतकरी, शेतमजूर यांना काँग्रेस सरकारच्या काळाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानातून अन्न, धान्य, साखर, रॉकेल, डाळीचा पुरवठा करावा, संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन वाढवून दोन हजार रूपये करावे, सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा १० हजार रूपये बेरोजगार भत्ता द्यावा, एमपीएससी, युपीएससीची रिक्त पदे त्वरीत जाहीर करावी, सुशिक्षीत बेरोजगारांचे सर्वेक्षण करावे, लोखंड कारखाना स्थापन करून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार द्यावा, रखडलेली शिष्यवृत्तीची रक्कम द्यावी, ५० टक्के ओपनच्या जागा भरताना गुणवत्ताप्राप्त मागस प्रवर्गातील उमेदवारांना संधी द्यावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार नाना पटोले, मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रसचे निरिक्षक सुरेश भोयर, प्रतिभा रघुवंशी, माजी आमदार आनंदराव गेडाम, अविनाश वारजुरकर, पंकज गुड्डेवार, सहसराम पोरेटे, एन. टी. किरसान, सतीश वारजुरकर, हसनअली गिलानी, रवींद्र दरेकर, प्रकाश इटनकर, जीया पटेल, नितीन कुंभलकर, प्रफुल्ल गुडघे, नरेंद्र जिचकार, संजय चरडुके, प्रमोद भगत, रवींद्र शहा, निशांत नैताम, वैभव भिवापुरे, दीपक ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर, रूपाली पंदिलवार, वैशाली ताटपल्लीवार, कविता भगत, मनोहर पोरेटी, बंडू शनिवारे, विश्वजित कोवासे, जेसा मोटवानी, नरेंद्र गजपुरे, नेताजी गावतुरे, नगरसेवक सतीश विधाते, अमोल भडांगे, निलेश राठोड, शंकरराव सालोटकर, किशोर चापले, सुदाम मोटवानी, अर्पणा खेवले, ढोक, जयंत हरडे, जीवन नाट, परसराम टिकले, पी. आर. आकरे, तौफीख शेख, गौरव आलाम, रजनिकांत मोटघरे यांनी केले.
मोर्चाचे आयोजन गडचिरोली-चिमूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.
युवक काँगे्रसच्या नेतृत्वामुळे आंदोलनात दिसले एकीचे बळ
काँग्रेस पदाधिकाºयांमध्ये बºयाच वेळा एखाद्या आंदोलनावरून मतभेद निर्माण होतात. एका गटाचे आंदोलन असेल तर दुसºया गटाचे पदाधिकारी सहभागी होत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र युवक काँग्रेसच्या मुख्य नेतृत्वात सोमवारी काढलेल्या मोर्चात जिल्हाभरातील वरिष्ठ फळीतले सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी मतभेद विसरून सहभागी झाले होते. एवढेच नाही तर जिल्हा परिषद सदस्य, पं.स. सभापती, माजी जि.प.उपाध्यक्ष यांनी सुध्दा कार्यकर्त्यांसह आंदोलनात हजेरी लावली होती. त्यामुळे आंदोलनात काँग्रेसचे एकीचे बळ दिसले.
१ वाजता इंदिरा गांधी चौकातून बैलबंडी मोर्चा निघाला. माजी खासदार नाना पटोले, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, निरिक्षक सुरेश भोयर यांच्यासह वरिष्ठ फळीतील पदाधिकारी बैलबंडीवर स्वार झाले होते. कडक ऊन असल्याने घामाच्या धारा वाहत असतानाही इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे सुमारे तीन किमीचे अंतर कार्यकर्त्यांनी पायदळ तर पदाधिकाºयांनी बैलबंडीवर गाठले. बैलबंडी, हजारो कार्यकर्ते यामुळे काही काळ गडचिरोली शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

 

Web Title: Strike of Bailbandi Morcha of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.