सिरोंचा न.पं.वर नागरिकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:54 AM2018-07-22T00:54:26+5:302018-07-22T00:55:25+5:30

सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचे तसेच पदाधिकारी व सदस्यांचे सिरोंचा माल व रैयत वॉर्डाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन सिरोंचा मालबाबत दुजाभाव करीत आहे. सिरोंचा माल येथील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी या वॉर्डातील शेकडो नागरिकांनी सिरोंचा नगर पंचायतीवर धडक दिली .....

The strike of citizens on the Sironcha NP | सिरोंचा न.पं.वर नागरिकांची धडक

सिरोंचा न.पं.वर नागरिकांची धडक

Next
ठळक मुद्देपाण्यासाठी संतापले लोक : दुजाभाव होत असल्याचा सिरोंचामालवासीयांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचे तसेच पदाधिकारी व सदस्यांचे सिरोंचा माल व रैयत वॉर्डाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन सिरोंचा मालबाबत दुजाभाव करीत आहे. सिरोंचा माल येथील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी या वॉर्डातील शेकडो नागरिकांनी सिरोंचा नगर पंचायतीवर धडक दिली व मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना सादर केले.
सिरोंचा माल येथे मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. परिणामी महिलांना पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी पुरवठ्याची समस्या वेळोवेळी तयार होत असल्याने महिला त्रस्त आहेत. पाणी पुरवठा लवकरच सुरू करावा. सिरोंचा माल येथे साफसफाईकडे दुर्लक्ष झाले आहे. नाल्यांचा उपसा सुध्दा करण्यात आला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. नाली उपसा न करताच लाखो रूपयांच्या देयकांची उचल झाली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट न लावता अनावश्यक ठिकाणी हायमास्ट लावले आहेत. सिरोंचा माल येथे सर्व रस्ते कच्चे आहेत. पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखल निर्माण होते. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवावे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये धर्मराव वसतिगृह आहे. या ठिकाणी डासाचे प्रमाण अधिक असल्याने सदर वसतिगृह दुसऱ्या ठिकाणी हलवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
मोर्चाचे नेतृत्व नगरसेवक नरेश अलोणे, रवी रालबंडीवार, मुमताज बेगम हुसेन खान, बबलू पाशा, जगदिश रालबंडीवार, सय्यद सलाम, सिध्दीक अली, याकुबबाबा, नरसिंग सीलवेरी, आसिफ खान यांनी केले.
कोत्तागुडम गावातून निघालेला मोर्चा पोलीस स्टेशन मार्गे नगर पंचायतीवर धडकला. नगर पंचायतचे सहायक प्रभारी लेखापाल एम. एस. पेंदाम, नगर अभियंता ए. ए. खान यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष अनुपस्थित होते. मोर्चेकºयांनी नगर पंचायतीविरोधात घोषणा दिल्या. पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायत ठेवावी, अशी मागणी केली. नगर पंचायतवरून मोर्चा बसस्थानक, राजीव चौक मार्गे तहसील कार्यालयावर गेला. नायब तहसीलदार राहूल वाघ व गोर्धन गागापुरपु यांना निवेदन दिले. २४ तासात पाणी पुरवठा सुरू न झाल्यास नगर पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: The strike of citizens on the Sironcha NP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.