वंचितांची नगर परिषदेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:19+5:30
गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या लाभार्थ्याचे घर जीर्ण झाले असल्याने त्याला विनाअट घरम मंजूर करावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या शेकडो नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात शुक्रवारी नगर परिषदेवर धडक दिली. मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांना सादर करण्यात आले. मूलभूत समस्या न सोडविल्यास भविष्यात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला.
गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या लाभार्थ्याचे घर जीर्ण झाले असल्याने त्याला विनाअट घरम मंजूर करावे. घरटॅक्स १० टक्के वाढविला आहे तो कमी करावा. स्वच्छ, शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. भूमीगत गटार पाईपलाईनचे काम करताना एका वार्डातील काम झाल्याशिवाय दुसºया वार्डात सुरू करू नये. ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करावे. फुटपाथधारकांना दुकानगाळे उपलब्ध करून द्यावे. दर आठवड्याला नाल्या साफ कराव्या. कारगिल चौकाच्या जवळून विज्ञान महाविद्यालयाकडे जाणाºया रस्त्याचे डांबरीकरण करावे. नगर परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय करावी. आदी मागण्यांसाठी चामोर्शी मार्गावरील पेपरमिल कार्यालय ते नगर परिषदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गोकुलनगर, विवेकानंदनगर, कैकाडी वस्तीमधील शेकडो नागरिक व महिला सहभागी झाल्या.
मुख्याधिकारी जोपर्यंत आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा दिल्याने मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारले. यावेळी काही समस्या १५ दिवसात मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन न.प.च्या वतीने देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे बाळू टेंभुर्णे, गजानन कुकुडकर, जी. के. बारसिंगे, माला भजगवळी, नरेश महाडोळे, योगेंद्र बांगरे, गुलाब मुघल, डाकराम वाघमारे, राजेंद्र बांबोळे, धर्मेंद्र गोवर्धन, डॉ. योगेश नंदेश्वर, सीमा दुर्गे, ज्योती जनबंधू, ज्योती दहिकर, गीता भोयर, डी. आर. जांभूळकर, अनिल राऊत, अनिल निकुरे यांनी केले.