सुरक्षेसाठी घराला हवा मजबूत कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:27 AM2020-12-27T04:27:07+5:302020-12-27T04:27:07+5:30
पूर्वीच्या तुलनेत आता घराची व दुकानाची रचना बदलली आहे. विविध प्रकारचे मुख्य गेट घराला बसविले जात आहे. दुमजली, तीनमजली ...
पूर्वीच्या तुलनेत आता घराची व दुकानाची रचना बदलली आहे. विविध प्रकारचे मुख्य गेट घराला बसविले जात आहे. दुमजली, तीनमजली घरे शहरी भागात हाेत आहेत. शिवाय गडचिराेली शहरासह अनेक ठिकाणी अपार्टमेंट तयार केले जात आहेत. अशा आधुनिक रचनेच्या घराला कुलूपही तेवढेच मजबूत व दणकट लावणे गरजेचे आहे.
गडचिराेली शहराच्या बाजारपेठेत ४०, ५०, ६०, ७० ते ९० एमएमचे कुलूप आहे. गडचिराेली शहरासह जिल्ह्यात ५० एमएम आकाराच्या कुलूपाला अधिकाधिक मागणी असल्याचे गडचिराेली शहरातील एका दुकानदाराने लाेकमतशी बाेलताना सांगितले.
गडचिराेली शहरात गेल्या दाेन ते तीन वर्षांत दुकानांची संख्या प्रचंड वाढली आहे. दुकानाच्या शटरसाठी जास्तीत जास्त दणकट व महागडे कुलूप खरेदी करण्यासाठी संबंधितांना १५ हजार रुपये माेजावे लागतात. तर घरासाठी दणकट व मजबूत कुलूप खरेदी करण्यासाठी ४५० ते ५५० रुपये माेजावे लागतात. शहरातील बाजारपेठेतील माेठ्या दुकानात व फुटपाथवर विविध प्रकारचे व विविध आकाराचे स्वस्त, महाग कुलूप विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
बाॅक्स...
वर्षभरात शहरात झाल्या १५ घरफोड्या
गडचिराेली शहरात १२ प्रभाग असून २५ वाॅर्ड आहेत. याशिवाय गडचिराेली पाेलीस ठाण्याच्या हद्दीत, नवेगाव, काॅम्प्लेक्स, इंदाळा आदी भागाचा समावेश आहे. जानेवारी ते २० डिसेंबर २०२० या वर्षभराच्या कालावधीत शहरात छाेट्या-माेठ्या मिळून १५ घरफाेड्या व चाेरीच्या घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये चाेरांनी राेख रक्कम व दागिणे आदी माल लंपास केला तर काही घटनांमध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे चाेराला रिकाम्या हाताने जावे लागले. पाेलिसांतर्फे चाेरींबाबत जनजागृती केली जाते.
बाॅक्स...
ऑनलाईन कुलूप खरेदीत हाेते फसवणूक
गेल्या तीन ते चार वर्षांपासून विविध साहित्याच्या ऑनलाईन खरेदी-विक्री प्रक्रियेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. असे असले तरी नामांकित कंपनीचे वगळता इतर लाेकल कंपनीचे माेठे व दणकट दिसणाऱ्या कुलूपाची अनेक ग्राहक ऑनलाईन बुकींग करतात. माेठी किंमत देऊनही पाहिजे तसे कुलूप ग्राहकांना मिळत नाही.