एसटीचे उत्पन्न व भारमानही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:20 PM2019-03-26T22:20:02+5:302019-03-26T22:20:45+5:30

एसटीचे उत्पन्न व प्रगती याबाबतचा आढावा घेण्यात आला. या आढावाव्यामध्ये २०१७-१८ या वर्षीच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षात एसटीच्या उत्पन्न व भारमानात लक्षनिय घट झाल्याचे दिसून आले आहे. पुढील आर्थिक वर्षात मार्ग तपासणीची व्यापक मोहीम राबवून उत्पन्न वाढीचा प्रयत्न केला जाणार आहे.

ST's income and weightlifting also decreased | एसटीचे उत्पन्न व भारमानही घटले

एसटीचे उत्पन्न व भारमानही घटले

Next
ठळक मुद्दे२०१८-१९ चा आढावा : चालक-वाहक व तपासणी पथक जबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एसटीचे उत्पन्न व प्रगती याबाबतचा आढावा घेण्यात आला. या आढावाव्यामध्ये २०१७-१८ या वर्षीच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षात एसटीच्या उत्पन्न व भारमानात लक्षनिय घट झाल्याचे दिसून आले आहे. पुढील आर्थिक वर्षात मार्ग तपासणीची व्यापक मोहीम राबवून उत्पन्न वाढीचा प्रयत्न केला जाणार आहे.
एसटीला खासगी वाहनांसोबत स्पर्धा करावी लागत आहे. खासगी वाहतूक सेवेसोबत स्पर्धा करताना एसटीने स्वत:मध्ये अनेक बदल केले आहेत. मात्र तोट्याच्या चिखलात सापडलेले एसटीचे चाक बाहेर निघण्यास कठीण जात आहे. राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्न व भारमानाचा आढावा घेतला असता, यामध्ये चालक व वाहक हे प्रवासी घेण्याबाबत उदासीन आहेत. लांब व मध्यम पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये घट झाल्याने एसटीचे उत्पन्न घटले आहे. तसेच उत्पन्न घटण्यास मार्ग तपासणी पथक जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
मार्ग तपासणीची यंत्रणा सक्षम झाल्यास एसटीचे उत्पन्न वाढू शकते, असा विश्वास राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाला असल्याने व्यवस्थापनाने मार्ग तपासणीसाठी पथकांसाठी १०३ वाहने खरेदी केली आहेत. त्यातील एक वाहन गडचिरोली विभागातील पथकाला उपलब्ध झाले आहे. सदर वाहन केवळ मार्ग तपासणीसाठीच वापरण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मार्ग तपासणी पथकाला सक्त निर्देश
एसटीचे भारमान व उत्पन्न कमी होण्यास चालक व वाहकांसह मार्ग तपासणी पथकालाही जबाबदार धरण्यात आले आहे. त्यामुळे मार्ग तपासणी मोहीम कडक करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त मार्ग तपासणी पथके तयार करावी, महिन्यातून एकदा जॅकपॉट मार्ग तपासणी कार्यक्रम राबवावा, सर्व आगारांच्या रात्रवस्तीच्या बसेसची नियमित तपासणी करावी, सर्व वाहकांची तपासणी दरमहा व अपहार प्रवृत्त वाहकांची तपासणी महिन्यातून दोनवेळा करावी, रात्रवस्तीच्या बसेसची तपासणी महिन्यातून एकदा करावी, मध्यम, लांब पल्ला, रातराणी सेवा व आंतरराज्यीय सेवांची सातत्यपूर्ण तपासणी करावी, आपल्या विभागातून जाणाऱ्या व येणाºया इतर विभागांच्या बसेसची तपासणी प्रत्येक महिन्यातून दोनवेळा करावी, आगारभेटीसाठी जाणाºया सर्व अधिकाऱ्यांनी येता-जाता मार्ग तपासणी करावे, तडजोड प्रकरणी व कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत कामगिरीवर रूजू करून घेण्यात आलेल्या वाहकांची तपासणी वारंवार करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: ST's income and weightlifting also decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.