खड्डेमय रस्त्यांमुळे एसटीचा प्रवास खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:44 AM2021-09-08T04:44:24+5:302021-09-08T04:44:24+5:30
गडचिराेली : जिल्ह्यातील प्रमुख मार्गांबराेबरच इतरही काही मार्ग अतिशय खराब झाले आहेत. सामाजिक दृष्टिकाेन लक्षात घेऊन या मार्गांवर एसटीच्या ...
गडचिराेली : जिल्ह्यातील प्रमुख मार्गांबराेबरच इतरही काही मार्ग अतिशय खराब झाले आहेत. सामाजिक दृष्टिकाेन लक्षात घेऊन या मार्गांवर एसटीच्या फेऱ्या चालवाव्या लागत आहेत. मात्र या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांचे चांगलेच हाल हाेत आहेत. तसेच एसटीचेही नुकसान हाेत आहे.
गडचिराेली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण आहे. या भागात खासगी प्रवासाची वाहने अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या मार्गावर एसटीची वाहने चालवावीच लागतात. मात्र जिल्ह्यातील काही मार्गांची माेठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. माेठमाेठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्यासुद्धा अधिक आहे. एसटी हे तुलनेने माेठे वाहन आहे. त्यामुळे खड्डा चुकविणे कठीण हाेते. तरीही नागरिकांची अडचण लक्षात घेऊन एसटी बसेस साेडाव्या लागत आहेत. पावसाळ्यात डांबरी मार्गांची दुरुस्ती करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे पुन्हा तीन महिने अशाच पद्धतीच्या मार्गांवरून वाहने चालविल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
बाॅक्स...
एसटीचा खर्च वाढला
मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन कमी वेगाने चालवावे लागते. एका खड्ड्यातून एसटी बस दुसऱ्या खड्ड्यात जाते. सततच्या आदळआपटीमुळे एसटीचे टायर लवकरच खराब हाेत आहेत. तसेच खिडक्यांच्या काचा फुटणे, बेअरिंग खराब हाेणे, नटबाेल्ट ढिले हाेणे यांसारखे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे एसटीच्या देखभालीचा खर्च वाढत चालला आहे. कमी वेगाने वाहन चालवावे लागत असल्यामुळे डिझेलचाही खर्च वाढला आहे.
बाॅक्स...
आलापल्ली-सिराेंचा मार्ग सर्वांत खराब
आलापल्ली-सिराेंचा हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घाेषित करण्यात आला आहे. मात्र या मार्गाची मागील दाेन वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही. आता या मार्गावर माेठमाेठे खड्डे पडले आहेत. दाेन तासांचा प्रवास तीन ते चार तास करावा लागत आहे. या मार्गामुळे प्रवासीसुद्धा त्रस्त झाले आहेत.
बाॅक्स...
मार्ग वळविणे शक्य नाही
गडचिराेली जिल्ह्याचा विस्तार उत्तर-दक्षिण सर्वाधिक आहे, तर पूर्व-पश्चिमेचा विस्तार अतिशय कमी आहे. काेरची ते सिराेंचा हा प्रमुख मार्ग आहे. या एकाच मार्गाने बहुतांश तालुके जाेडण्यात आले आहेत. त्यामुळे एखादा मार्ग खराब असला तर दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविणे शक्य नाही. तसेच गडचिराेली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गाचीही दुर्दशा झाली आहे.
बाॅक्स...
जिल्ह्यातील बसेस
गडचिराेली आगार
एकूण बसेस - १०३
सुरू बसेस - ८१
अहेरी आगार
एकूण बसेस - ७८
सुरू बसेस - ५७