विद्यार्थी, शिक्षिकेने दिला वृद्ध महिलेला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:34 AM2021-02-07T04:34:46+5:302021-02-07T04:34:46+5:30

वयाची सत्तरी गाठलेली एक वृद्ध महिला काेरची येथे बायपास राेडजवळ पायी येत हाेती. मात्र तिला चालणेही शक्य हाेत नव्हते. ...

The student, the teacher gave a helping hand to the old lady | विद्यार्थी, शिक्षिकेने दिला वृद्ध महिलेला मदतीचा हात

विद्यार्थी, शिक्षिकेने दिला वृद्ध महिलेला मदतीचा हात

Next

वयाची सत्तरी गाठलेली एक वृद्ध महिला काेरची येथे बायपास राेडजवळ पायी येत हाेती. मात्र तिला चालणेही शक्य हाेत नव्हते. तिने अनेकांना मदत मागितली. दुचाकी वाहनचालकांना आवाज देऊन इच्छितस्थळी पाेहाेचवून देण्याची विनंती केली. मात्र काेणीही त्या वृद्ध महिलेची मदत केली नाही. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांची मातृछाया हरविलेली हाेती अशा विद्यार्थ्यांना त्या वृद्ध महिलेची कीव आली. त्यांनी तिला उचलून उभे केले. मात्र ती एवढी अशक्त हाेती की उभी राहू शकत नव्हती. आयटीआय शिकणारे विद्यार्थी वृद्ध महिलेला इच्छितस्थळी नेण्यासाठी वाहनधारकांना हाक देत हाेते.

यादरम्यान मार्गावरून निलाेफर काझी नामक शिक्षिका येत हाेती. त्यांनी वाहन थांबवून त्या विद्यार्थ्यांची मदत केली. स्वत:च्या दुचाकीवर त्या आजीबाईला बसवून तिच्या ठिकाणापर्यंत पाेहाेचवून दिले. आपल्या घरी जाऊन तिला जेवणसुद्धा आणून दिले. आयटीआयमध्ये शिकणारे विद्यार्थी रूपेश खदाले, निखील साखरे व किशाेर सलामे हे तीन विद्यार्थी व त्या शिक्षिकेने वृद्ध महिलेची पूर्ण मदत केली. त्यामुळे त्या महिलेला ईश्वरीसेवेचा प्रत्यय आला.

फाेटाे - वृद्ध महिलेला दुचाकीवर बसवून नेताना शिक्षिका निलाेफर काझी.

Web Title: The student, the teacher gave a helping hand to the old lady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.