पहिले सत्र संपण्याच्या मार्गावर तरीही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:40 AM2021-09-22T04:40:23+5:302021-09-22T04:40:23+5:30
शालेय शिक्षण विभागाने यावर्षी मोफत पाठ्यपुस्तक पेढी योजनेतील पुस्तके शाळेपर्यंत पोहोचविण्याचा नवा कंत्राट मुंबईच्या शिरिष कार्गो सर्व्हिसेस लिमिटेड या ...
शालेय शिक्षण विभागाने यावर्षी मोफत पाठ्यपुस्तक पेढी योजनेतील पुस्तके शाळेपर्यंत पोहोचविण्याचा नवा कंत्राट मुंबईच्या शिरिष कार्गो सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला दिला आहे. अजूनपर्यंत या कंत्राटदाराने पुस्तके पोहोचवलेली नाही. अशा तक्रारी प्रत्येक जिल्ह्यात समोर आलेल्या आहे. मागील वर्षीपर्यंत पुस्तके तालुका स्थळापर्यंत पाेहाेचविली जात हाेती. यावर्षी ही पुस्तके केंद्र व पुढे शाळेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कंत्राटदारावर साेपविली आहे. मात्र पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली ,चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्यात केंद्र शाळांपर्यंत कंत्राटदाराने पुस्तके पोहोचविली नाही व अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातील सुद्धा असू शकते. पाठ्यपुस्तकांशिवाय शिक्षण अशक्य आहे. शिक्षण विभागाने कोट्यावधी रुपये खर्च करून बालभारतीमार्फत छपाई केलेली पाठ्यपुस्तके कुठे गडप झाली हे अनाकलनीय आहे. पुस्तके वितरणासाठी सुमारे ३ काेटी ९४ लक्ष रुपयांचे कंत्राट काढले हाेते. अजून पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही ही बाब शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रचंड संशय निर्माण करणारी आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांचे हे वर्ष पुस्तकांशिवाय जाणार की काय? याच वर्षी कंत्राटदाराला शाळेपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचा कंत्राट का देण्यात आला? हे देखील संशयास्पद आहे. शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची चिंता नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.