विद्यार्थ्यांनी उच्चपदे मिळवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:45 AM2019-02-04T00:45:00+5:302019-02-04T00:47:03+5:30
स्पर्धत टिकायचे असेल तर सर्वांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत २४ कोटी रुपये खर्च करून ,,,,,,,,,,
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : स्पर्धत टिकायचे असेल तर सर्वांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत २४ कोटी रुपये खर्च करून अहेरीत इंग्रजी माध्यमाचे निवासी एकलव्य मॉडेल स्कूल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ८० कोटी रुपये खर्च करून आदिवासी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह बांधले जात आहेत या सर्व शैक्षणिक सोयीसुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी उच्चपदस्थ अधिकारी व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
अहेरी येथे आदिवासी विकास विभागाकडून इसत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या आदिवासी विदयार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे याकरिता एकलव्य निवासी विद्यालय बांधण्यात आले. या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते.
सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर, महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, जि. प. समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, न.पं. उपाध्यक्ष कमल पडगेलवार, नगरसेविका स्मिता येमुलवार सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन अंबोसे, अहेरीच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बंसल उपस्थित होते.
अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक विकासकामे सुरु झाली आहेत. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, शेती सिंचन आदी कामे सुरू आहेत. येत्या काही दिवसात अहेरी जिल्ह्याची निर्मिती होईल. वेगळा जिल्हा झाला तर अधिक गतीने विकास होईल, असेही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सांगितले. यावेळी दीपक खांडेकर यांनीही मार्गदर्शन केले. मनीषा वर्मा यांनी राज्यात २० एकलव्य शाळा निर्माण केल्या जाणार आहेत. या प्रत्येक शाळांच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते बारावीपर्यं ४७० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे,असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. इंदूराणी जाखड, संचालन शिक्षक भाऊराव पोटे तर आभार सतीश पडघन यांनीे मानले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.