विद्यार्थ्यांनी जाणले पोलीस दल

By admin | Published: January 8, 2017 01:36 AM2017-01-08T01:36:47+5:302017-01-08T01:36:47+5:30

नक्षलप्रभावित असलेल्या कोठी येथील विद्यार्थ्यांनी एसडीपीओ संदीप गावित यांच्यासोबत संवाद साधून

Students knew the police force | विद्यार्थ्यांनी जाणले पोलीस दल

विद्यार्थ्यांनी जाणले पोलीस दल

Next

पोलीस रेजिंग डे : भामरागडातून कोठीच्या विद्यार्थ्यांशी व्हीसीवरून बातचित
भामरागड : नक्षलप्रभावित असलेल्या कोठी येथील विद्यार्थ्यांनी एसडीपीओ संदीप गावित यांच्यासोबत संवाद साधून परिसरातील समस्या गावित यांच्या लक्षात आणून दिल्या. त्याचबरोबर कोठीतील पोलिसांनी विद्यार्थ्यांना पोलीस दलाचे कामकाज कसे चालते. याविषयी मार्गदर्शन केले.
पोलीस रेजिंग डे निमित्त कोठी पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली. भेटीदरम्यान पोलिसांनी स्टेशनवरील डायरी कशी लिहिली जाते. या डायरीचे पोलीस दलात असलेले महत्त्व गुन्ह्यांचा तपास, आरोपींना अटक, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य पोलिसांना कसे प्रकारे महत्त्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पोलिसांच्या शस्त्रांबाबत विशेष उत्सुकता राहते. त्यामुळे पोलिसांनी शस्त्रांविषयची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी स्वतंत्र शस्त्र प्रदर्शनी लावण्यात आली होती. पोलीस प्रशासन व्हिडीओ कॉन्फरन्सींगमुळे अत्याधुनिक झाले आहे. या व्हिडीओ कॉन्फरन्सींगचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक महिन्यापूर्वी झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भामरागडातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. याच तंत्रज्ञानाचा वापर करून भामरागडचे एसडीपीओ संदीप गावित यांनी कोठी येथील नागरिक व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भागातील अडचणी जाणल्या.
कार्यक्रमाचे आयोजन कोठी मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अमल कदम, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट शर्मा, पीएसआय भिवसने, मिथून सावंत, प्रकाश कांबळे, अभिषेक जनगमवार, बीसेन, कुंभारे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Students knew the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.