विद्यार्थ्यांनी जाणली शस्त्रांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:37 PM2019-01-02T23:37:14+5:302019-01-02T23:39:04+5:30

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बुधवारी (दि.२) महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त (रेझिंग डे) स्थानिक गडचिरोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पोलिसांच्या अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले.

Students know the weapon information | विद्यार्थ्यांनी जाणली शस्त्रांची माहिती

विद्यार्थ्यांनी जाणली शस्त्रांची माहिती

Next
ठळक मुद्देआठवडाभर कार्यक्रम : गडचिरोली पोलीस ठाण्यातर्फे ‘रेझिंग डे’ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बुधवारी (दि.२) महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त (रेझिंग डे) स्थानिक गडचिरोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पोलिसांच्या अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर शहराच्या विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शस्त्राच्या वापराबाबतची आणि पोलिसांच्या कामकाजाची माहिती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली.
शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन नक्षल अभियानाचे पोलीस उपअधीक्षक समीर साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड उपस्थित होते.
रेझिंग डे निमित्त गडचिरोली शहरातून पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. यामध्ये बीडीडीएस पथक, सी-६० पथक, श्वानपथक, बँड पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
२ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिवस म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून २ ते ८ जानेवारीदरम्यान आठवडाभर रेझिंग डे च्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी गडचिरोली पोलीस संकूल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन व पोलीस मदत केंद्राअंतर्गत शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमांची रेलचेल
रेझिंग डे निमित्त पोलीस दलातर्फे ८ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रस्ता सुरक्षाविषयी लोकजागृती, सायबर गुन्ह्याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय सायबर दिंडी, कॅरम स्पर्धा, व्यसनमुक्ती संकल्प तसेच कृषी मार्गदर्शक शिबिर आदी कार्यक्रम होणार आहेत. नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शस्त्रांचे जवळून निरीक्षण
शस्त्राच्या प्रदर्शनीत एसएलआर, एलएमजी, पिस्टल, एनव्हीडी, जीपीएस, श्वानपथक यांच्यासह पोलीस विभागाच्या अत्याधुनिक शस्त्रांचा समावेश होता. कोणत्या शस्त्राचा वापर के व्हा व कसा करावा, शस्त्र वापरताना वेळ कशी साधायची, कोणत्या वेळी कोणते शस्त्र वापरायचे आदीबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. काही विद्यार्थ्यांनी सदर शस्त्र हाती घेऊन पाहून त्याचे जवळून निरीक्षण केले.

Web Title: Students know the weapon information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस