पाचवीपासून शाळा सोडलेले विद्यार्थी पोहोचले दहावीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:37 AM2017-12-17T00:37:41+5:302017-12-17T00:38:06+5:30

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वेंकटेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीनिवास हायस्कूलमध्ये पाचवीपासून शाळा सोडलेले अनेक विद्यार्थी पुढचे सर्व वर्ग उत्तीर्ण होऊन दहावीच्या हजेरीपटावर पोहोचल्याचा रहस्यमय प्रकार घडला आहे.

Students leaving school from the fifth grade have reached! | पाचवीपासून शाळा सोडलेले विद्यार्थी पोहोचले दहावीत!

पाचवीपासून शाळा सोडलेले विद्यार्थी पोहोचले दहावीत!

Next
ठळक मुद्देहजेरीपटाचे गूढ रहस्य : शिष्यवृत्ती, पोषण आहारासह इतर लाभ लाटल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वेंकटेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीनिवास हायस्कूलमध्ये पाचवीपासून शाळा सोडलेले अनेक विद्यार्थी पुढचे सर्व वर्ग उत्तीर्ण होऊन दहावीच्या हजेरीपटावर पोहोचल्याचा रहस्यमय प्रकार घडला आहे. यासंदर्भात संस्थेच्या माजी सचिवानेच शिक्षणमंत्र्यांसह सर्व संबंधित अधिकाºयांकडे तक्रारी केल्या. पण या प्रकाराची गांभिर्याने दखल घेण्याऐवजी शिक्षण विभागाकडून थातूरमातूर अहवाल तयार करून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अंकिसाच्या श्रीनिवास हायस्कूलमध्ये गेल्यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात हा प्रकार घडला. मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी शाळेतील २७ विद्यार्थ्यानी फॉर्मच भरले नसल्याचे लक्षात आल्यानंतर संस्थेचे माजी सचिव श्रीनिवास वनमामुला यांनी या प्रकाराचा मागोवा घेतला. ते २७ विद्यार्थी शाळेत कधी येतच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थी व त्यांच्या पालकांची भेट घेऊन चौकशी केली असता पाचवीपासूनच शाळा सोडल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. एवढेच नाही तर ते अनुपस्थित विद्यार्थी कधी वर्गातही येत नव्हते असे शाळेत नियमित येणाºया विद्यार्थ्यांनी सांगितले.
वनमामुला यांनी या शाळेत येणाºया विद्यार्थ्यांच्या बयाणाचे व्हिडीओ रेकॉर्र्डिंग करून तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांचे लेखी बयाण घेऊन या गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र शिक्षणाधिकाºयांपासून सर्वांनी थातूरमातूर चौकशीपलिकडे कोणतीही कारवाई केली नाही.
शासनाच्या नियमानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळेत टाकल्यानंतर त्यांना नापास करता येत नाही, अशी बाजू मुख्याध्यापक वाढई यांनी मांडली. मात्र पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थी पुढच्या वर्गात ढकलत नेताना त्यांच्या नावावर येणारा शालेय पोषण आहार, शिष्यवृत्ती अशा योजना लाटल्या असण्याची शक्यता तक्रारकर्ते श्रीनिवास वनमामुला यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर शिक्षणाधिकाºयांनी गटशिक्षणाधिकाºयांमार्फत थातुरमातूर चौकशी केली. पण वनमामुला यांनी पुनचौकर्शीचे पत्र शिक्षण उपसंचालक, शिक्षण सचिवांना दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गुढे यांना दिले. त्यांनी ४ आॅक्टोबर २०१७ ला दिलेल्या आपल्या चौकशी अहवालात मुख्याध्यापकाचा हवाला देत ते २७ विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीमुळे शेतात काम करायला जातात, त्यामुळे परीक्षेला प्रविष्ठ झाले नाही असे म्हटले. मात्र त्या विद्यार्थ्यांची, पालकांची किंवा तक्रारकर्ते वनमामुला यांची भेट, बयाण घेतले नाही.
या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत असे १५० ते २०० बोगस विद्यार्थी असून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिक्षण मंत्रालयाकडे केली आहे.
अपहाराची कबुली, पण कारवाई नाही
शिक्षणाधिकाºयांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये दिलेल्या चौकशी अहवालात श्रीनिवास हायस्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २००८-०९ पासून २००१२-१३ पर्यंत प्रलंबित असल्याचे तसेच २०१३-१४ मध्ये शिष्यवृत्तीत अपहार केल्याचे निदर्शनास आले, असे अहवालात म्हटले आहे. मात्र अपहार झाल्याचे दिसत असताना कारवाई मात्र काहीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व गैरप्रकारांना शिक्षण विभागाचे तर पाठबळ नाही ना? अशी दाट शंका उपस्थित होत आहे.

Web Title: Students leaving school from the fifth grade have reached!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.