१० वी, १२ वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड आवश्यक

By admin | Published: September 25, 2016 01:51 AM2016-09-25T01:51:51+5:302016-09-25T01:51:51+5:30

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करताना सदर विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे,

Students need Aadhar card for 10th, 12th examination | १० वी, १२ वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड आवश्यक

१० वी, १२ वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड आवश्यक

Next

कार्यवाही करा : शिक्षण मंडळाच्या सचिवांचे आदेश धडकले
गडचिरोली : शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करताना सदर विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे, असा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०१७ च्या बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षेकरिता आधार कार्ड क्रमांक आवेदनपत्रात भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या संदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या सचिवांनी लेखी पत्र सर्व विभागीय मंडळाच्या सचिवांना पाठविले असून तसे आदेश दिले आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना या संदर्भात तत्काळ कळवावे व या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण मंडळाच्या कार्यालयास सादर करावा, असे पत्रात नमूद केले आहे.
आधार कार्ड ही भारतातील बालक, विद्यार्थी व नागरिकांची ओळख आहे. बोर्डाच्या परीक्षेत बोगस विद्यार्थी प्रविष्ठ होण्याचा प्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाच्या सचिवांनी सदर निर्णय घेतला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Students need Aadhar card for 10th, 12th examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.