विद्यार्थ्यांनो, अभ्यासाबरोबरच खेळालाही प्राधान्य द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:06 AM2018-03-05T00:06:26+5:302018-03-05T00:06:26+5:30
भारतामध्ये प्रतिभावंत खेळाडूंची कमतरता नाही. मात्र पालक आपल्या पाल्यांना खेळासाठी प्रोत्साहित करीत नाही.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : भारतामध्ये प्रतिभावंत खेळाडूंची कमतरता नाही. मात्र पालक आपल्या पाल्यांना खेळासाठी प्रोत्साहित करीत नाही. खेळामध्ये सुध्दा करिअर घडविता येत असल्याने अभ्यासाबरोबरच बालकांना खेळासाठीही प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
गडचिरोली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, आॅल इंडिया चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज इटकेलवार, गडचिरोली डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश आयलवार, उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, डॉ. प्रशांत चलाख, अमित सूचक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात उत्तम खेळ खेळणाऱ्या खेळाडूची कमतरता अजितबात नाही. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. त्यादृष्टीने बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताकडे जगाला दिशा देऊ शकेल एवढे प्रतिभावंत युवा वर्ग उपलब्ध आहे. युवकांमधील प्रतिभा विकसीत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोरेड्डीवार यांनी केले. मनोज इटकेलवार यांनी मार्गदर्शन करताना बुद्धीबळासाठी आवश्यक असलेली साधन सामग्री जिल्हाधिकाºयांनी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.
यांनी पटकाविले विजेतेपद
बुध्दीबळ स्पर्धेमध्ये खुल्या गटातून आदित्य काकपुरे, रोशन कोंडावार, उमेश सहारे, स्वप्नील उराडे, अजय निंबाळकर, मोहम्मद लतीफ कुरेशी, दीप जुआरे, रोशन सहारे यांनी क्रमांक पटकाविला. अमेय काकापुरे, अंकूश मेश्राम, सुरज जयस्वाल व कुमूदिनी बारसागडे यांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले.
हायस्कूल गटातून आदित्य बोधलवार, तेजस बिट्टुरकर, ध्रुव शर्मा, सूयोग होनमने, तनिष्क दुधमोचन, खुशबू राऊत, क्षितीज नेरकर, आयुष ठाकरे, श्रीधर ढोरमेलवार, मृदूल दहिकर, राधा तंगडपल्लीवार, नंदिनी जोशी यांनी क्रमांक पटकाविला.
मिडल स्कूल गटातून प्रविण श्रीरामे, ओमकार रासेकर, निर्माण पोहणे, रूद्रेश पोहाडे, बादल शेंद्रे, श्रीरंग गौरकर, पार्थ आर्इंचवार, सारंग उरकुडे, क्षितीज शेंडे, संचित उरकुडे, क्षिरजा खाडे, श्रेष्ठी मुलकलवार, निरली पोटवार, कृष्णाई पोगुलवार, क्रिषीका कोहळे, रोशनी शर्मा यांनी क्रमांक पटकाविला.
प्राथमिक गटातून ओजस रासेकर, सार्थक भुजाडे, तनिष्का देवगडे, कृष्णा पोगुलवार, आर्य तंगडपल्लीवार, प्राची श्रीपदवार, सानिया शेख, चिन्मय खरवडे, क्षितीज कामडी, दीपक पार्तनी, वेद चलाख यांनी क्रमांक पटकाविला.