विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा जोपासावी
By admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:47+5:302016-01-02T08:34:47+5:30
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात काही दिवस एकत्र घालविल्याने विद्यार्थ्यांमध्ये विचार व गुणांचे आदानप्रदान होण्यास
आष्टी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात काही दिवस एकत्र घालविल्याने विद्यार्थ्यांमध्ये विचार व गुणांचे आदानप्रदान होण्यास मदत होते. त्याचबरोबर श्रमदान हा रासेयो शिबिराचा महत्त्वाचा भाग असून श्रमदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा जोपासण्याची मानसिकता निर्माण होते. त्यातून सामाजिक भान असणारे विद्यार्थी तयार होतात, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.
आष्टी येथील सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालयीन स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष सौरभ मुनघाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून पेपरमिलचे जनरल मॅनेजर राजीव मेजीरता, डॉ. एस. एम. रोकडे, जि.प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, माजी जि.प. उपाध्यक्ष भगीरथ येलमुले, माजी जि.प. सदस्य प्रभाकर पंदीलवार, सुधाकर मारगोनवार, प्राचार्य डॉ. अपर्णा मारगोनवार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सौरभ मुनघाटे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमदानाचे महत्त्व कळण्यास मदत होते, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान आंतर महाविद्यालयीन जुडो व पॉवरलिफ्टींग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविणाऱ्या चेतन पोतगंटावार, विवेक खोब्रागडे व शुभांगी बावणे यांचा कुलगुरूंच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अपर्णा मारगोनवार, संचालन तृप्ती ढुमणे व सोनू नागपुरे तर आभार प्रा. प्रविण गोहणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी भगवान धोटे, प्रा. संजय मुरकुटे, प्रा. डॉ. पंकज चव्हाण, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा. डॉ. प्रदीप कश्यप, प्रा. डॉ. एम. पी. सिंग, प्रा. डॉ. पी. के. सिंग, प्रा. सुचिता पेद्दीवार, प्रा. जया रोकडे, प्रा. रोशना बुरमवार, प्रा. अरविंद निमरड यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)