विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड दूर सारून तयारी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:50 PM2017-09-04T22:50:25+5:302017-09-04T22:50:42+5:30
विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास कुठेही कमी पडू देऊ नये, अभ्यास करताना लक्ष केंद्रीत करावे,
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास कुठेही कमी पडू देऊ नये, अभ्यास करताना लक्ष केंद्रीत करावे, अभ्यासाच्या वेळी अनावश्यक गोष्टी टाळाव्या, मर्यादित वेळेत फेसबूक, व्हॉट्स अॅपचा वापर करावा, मनातील न्यूनगंड दूर सारून जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी पीएसआय तेजस्वी पाटील यांनी केले.
लोकमतच्या वतीने शनिवारी चामोर्शी मार्गावरील युनिक अॅकॅडमीमध्ये आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेचे कृणाल पडालवार होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना गटचर्चा आवश्यक असते. या माध्यमातून अध्ययन केलेल्या विशिष्ट बाबी दृढ होतात. लोकमत वृत्तपत्र समूह व युनिक अॅकॅडमी पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेले सदर फायदेशीर ठरणार तर आहेच शिवाय विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही तेजस्वी पाटील म्हणाल्या.
स्पर्धेच्या जगात स्वत:चा करिअर घडविण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते होते. सद्य:स्थितीत स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. यात काही स्त्रोत प्रत्येकाला न परवडणारे असतात. अशावेळी प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन देणारा व सोपा मार्ग म्हणून वृत्तपत्र मोठी कामगिरी बजावत असते. ही बाब हेरून लोकमतने सुरू केलेले स्पर्धेच्या जगात हे सदर निश्चितच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºयांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठी या सदराच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध होईल. जे विद्यार्थी महागडी पुस्तके खरेदी करू शकत नाही. अशांना या सदराची कात्रणे उपयुक्त ठरतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सदराचे नियमित वाचन करून कात्रणे संग्रहीत करावीत, असे प्रतिपादन कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेचे संचालक कृणाल पडालवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत बालविकास मंचच्या जिल्हा संयोजिका किरण पवार तर संचालन व आभार संस्थेचे संचालक शैलेश खरवडे यांनी मानले. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शहरातील बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.