विद्यार्थ्यांनी करिअर घडविण्याच्या संधीचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:45+5:302021-09-02T05:18:45+5:30

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 'जागर करिअर कट्ट्याचा' या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत ...

Students should take advantage of career opportunities | विद्यार्थ्यांनी करिअर घडविण्याच्या संधीचा लाभ घ्यावा

विद्यार्थ्यांनी करिअर घडविण्याच्या संधीचा लाभ घ्यावा

Next

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 'जागर करिअर कट्ट्याचा' या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांकडून ३६५ दिवसांचे ३६५ रुपये असे नाममात्र शुल्क आकारले जाणार असून ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका सदराचे शुल्क भरून दुसऱ्या सदरात मोफत सहभागी होता येणार आहे. एवढेच नव्हे, तर विशिष्ट टप्पा पार केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक मोफत कोर्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहितीही शितोळे यांनी त्याप्रसंगी दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डाॅ. शंकर कुकरेजा, प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, प्राचार्य डॉ. आर. जी. मुनघाटे, प्राचार्य डॉ. अझिजुल हक, कार्यकारी प्राचार्य डॉ. व्ही. टी. चहारे आदी उपस्थित होते.

संचालन प्रा. प्रदीप चापले यांनी केले, तर आभार प्रा. बालाजी दमकोंडवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. लोकेशकुमार नंदेश्वर, डॉ. संजय एम. महाजन, प्रा. आकाश एस. मेश्राम यांनी सहकार्य केले. या आभासी कार्यक्रमात गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांतील अनेक प्राध्यापक वृंद व विद्यार्थी झूम आणि यु ट्यूबच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

(बॉक्स)

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा उद्देश

महाविद्यालयीन शिक्षण प्राप्त करीत असतानाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन मिळावे व ग्रामीण भागातील इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये इतरांशी स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीशी संलग्नित महात्मा गांधी कला, विज्ञान व न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी, आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय देसाइगंज, वडसा, नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रम्हपुरी, श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व विज्ञान महाविद्यालय ब्रम्हपुरी व वनश्री कला महाविद्यालय कोरची येथील स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने "जागर करिअर कट्ट्याचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Web Title: Students should take advantage of career opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.