विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:27 AM2019-02-25T01:27:16+5:302019-02-25T01:28:11+5:30
सोनार समाज हा संपूर्ण देशात विखुरलेला व अल्प समाज आहे. सोनार समाजातील विद्यार्थी थोडेफार शिक्षण घेतल्यानंतर आपल्या परंपरागत व्यवसाय व कारागिरीकडे वळतात. आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने सोनार समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरून प्रशासकीय सेवेकडे वळावे, ......
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : सोनार समाज हा संपूर्ण देशात विखुरलेला व अल्प समाज आहे. सोनार समाजातील विद्यार्थी थोडेफार शिक्षण घेतल्यानंतर आपल्या परंपरागत व्यवसाय व कारागिरीकडे वळतात. आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने सोनार समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरून प्रशासकीय सेवेकडे वळावे, असे आवाहन आरमोरी नगर पालिकेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी केले.
सोनार समाज शाखा आरमोरीच्या वतीने स्थानिक साई दामोधर मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीपदवार वट्टे होते. तर उद्घाटक म्हणून परिवर्तन पॅनलचे जिल्हा प्रमुख चंदू बेहरे होते. प्रमुख अतिथी म्हणून भामरागड पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी मदन काळबांधे, सोनार समाजाचे माजी अध्यक्ष प्रकाश बेहरे, गिरीधर काळबांधे, राजेश्वर फाये, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजय खरवडे, उपाध्यक्ष दीपक बेहरे, सोनार समाजाचे अध्यक्ष पंकज खरवडे, उपाध्यक्ष दिलीप श्रीरंगे, रूपेश गजपुरे आदी उपस्थित होते.
यावेळी चंदू बेहरे म्हणाले, राजकीय पातळीवर सोनार समाजाची शक्ती दाखविण्यासाठी सोनार समाजातील सर्व पोटशाखांनी एकत्र येण्याची गरज आहे. सोनार समाजातील महिलांनी चूल व मूल या संकल्पनेला तिलांजली देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. सोनार समाजाच्या ऐक्यासाठी समाज बांधवांनी संघटीत होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य वट्टे यांनी मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी श्रीराम मंदिर देवस्थानातून संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गावरून फिरवल्यानंतर मंगल कार्यालयात समारोप करण्यात आला. त्यानंतर भजन, किर्तन व गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज खरवडे, संचालन अजय काळबांधे यांनी केले तर आभार राहूल इनकने यांनी मानले.
यशस्वीतेसाठी हरीहर काळबांधे, संतोष करंडे, मंगेश बांगरे, अभिषेक बेहरे, शुभम इनकने, राकेश गजपुरे, तुषार खापरे, कुणाल भरणे, वामन साखरे, दिलीप इनकने, विनोद बेहरे, अक्षय बेहरे, शिवनाथ झरकर, आशिष मस्के, अरविंद डुंबरे, अमन गजापुरे, सचिन फाये आदींनी सहकार्य केले.
स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
नरहरी महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून सोनार समाजाच्या वतीने महिलांसाठी रांगोळी, वक्तृत्व, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धेत सविता खापरे प्रथम, रश्मी खरवडे द्वितीय तर ज्योती मस्के यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. संगीत खुर्ची स्पर्धे पुनम गजपुरे प्रथम, भूमिका खरवडे द्वितीय तर सुनिता गजापुरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. संगीता खुर्चीमध्ये पुरूष गटातून प्रफुल खापरे, शुभम इनकने, मंगेश बांगरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. मुलींच्या संगीत खुर्ची स्पर्धेत दिव्या खरवडे, वेदांत भरणे, श्रुती करंडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची खरवडे, द्वितीय क्रमांक सविता खापरे यांनी पटकाविला. या सर्व विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.