विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:57 AM2018-02-10T00:57:22+5:302018-02-10T01:03:14+5:30

आदिवासी व दुर्गम भागात वास्तव्य करीत असताना भौतिक, शैक्षणिक सोयीसुविधांच्या अभावाचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व सातत्य ठेवून आपला विकास साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले.

Students should work hard | विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे

Next
ठळक मुद्देभामरागड येथे मेळावा : एसडीओंचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : आदिवासी व दुर्गम भागात वास्तव्य करीत असताना भौतिक, शैक्षणिक सोयीसुविधांच्या अभावाचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व सातत्य ठेवून आपला विकास साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने भामरागड येथे बुधवारी वनविभागाच्या पटांगणात विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार कैलास अंडील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. भूषण चौधरी, पोलीस निरीक्षक सुरेश मदने उपस्थित होते. मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमटी मोडी धुर्वा, आरमोरीच्या गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, गडचिरोली पोलीस ठाण्याच्या पीएसआय नैताम उपस्थित होत्या.
मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यास व करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याचे संचालन पीएसआय झोल तर आभार राजरत्न खैरनार यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.
या मेळाव्याला भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा, राजे धर्मराव हायस्कूल, जय पेरसापेन माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, राजे विश्वेश्वरराव कला, वाणिज्य महाविद्यालय, मॉडेल स्कूल, लोकबिरादरी आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सवलतींची दिली माहिती
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागडच्या वतीने आयोजित विद्यार्थी मेळाव्यात शहरातील संपूर्ण शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. बहुतांश विद्यार्थ्यांना मराठी भाषेपेक्षा गोंडी भाषा अधिक प्रभावीपणे बोलता व समजत येत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमटी धुर्वा, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, पीएसआय नैताम यांनी स्थानिक गोंडी भाषेतून मार्गदर्शन केले. तसेच त्यांना आदिवासी विकास विभागामार्फत राबविल्या जाणाºया योजनांची माहिती दिली.

Web Title: Students should work hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.