‘स्पर्श’ हे विद्यार्थ्यांचे व्यासपीठ

By Admin | Published: January 11, 2017 02:16 AM2017-01-11T02:16:31+5:302017-01-11T02:16:31+5:30

शाळेमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी श्री किसनराव खोब्रागडे फाऊंडेशन अंतर्गत

Students 'touch' is the platform of students | ‘स्पर्श’ हे विद्यार्थ्यांचे व्यासपीठ

‘स्पर्श’ हे विद्यार्थ्यांचे व्यासपीठ

googlenewsNext

खोब्रागडे यांचे प्रतिपादन : आरमोरीत सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ
आरमोरी : शाळेमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी श्री किसनराव खोब्रागडे फाऊंडेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच शाळा विशेष प्रयत्न करतात. याचाच एक भाग म्हणजे ‘स्पर्श’ हा सांस्कृतिक व कला महोत्सव आहे. ‘स्पर्श’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते, असे प्रतिपादन श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे यांनी केले.
‘स्पर्श’ या सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे सचिव सचिन खोब्रागडे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. जे. व्ही. दडवे, प्राचार्य पी. एम. ठाकरे, सुशील खोब्रागडे, भाग्यलक्ष्मी खोब्रागडे, प्राचार्य डॉ. भगत, प्राचार्य क्रिष्णा राऊत, डॉ. वासनिक, डॉ. तुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटी संस्थेंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रंचित पोरेड्डीवार यांनी किसनराव खोब्रागडे संस्थेच्या मार्फतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. प्रास्ताविक प्रा. मनीष राऊत तर आभार अशोक बन्सोड यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Students 'touch' is the platform of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.