महासंचालकांच्या भेटीने हरखून गेल्या विद्यार्थिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:32 AM2021-02-08T04:32:43+5:302021-02-08T04:32:43+5:30

आदिवासी विद्यार्थ्यांसोबत जन्मदिवस साजरा करण्याची आंतरिक इच्छा आज पूर्ण झाली. हा कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय असून, कोरोनानंतरच्या या शाळेच्या सत्राला ...

Students who went to Harkhoon to meet the Director General | महासंचालकांच्या भेटीने हरखून गेल्या विद्यार्थिनी

महासंचालकांच्या भेटीने हरखून गेल्या विद्यार्थिनी

Next

आदिवासी विद्यार्थ्यांसोबत जन्मदिवस साजरा करण्याची आंतरिक इच्छा आज पूर्ण झाली. हा कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय असून, कोरोनानंतरच्या या शाळेच्या सत्राला आजच्या कार्यक्रमाने सुरुवात होत आहे, याचा आनंद आहे, अशा शब्दांत डॉ.पांढरपट्टे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयांच्या आढाव्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आलेल्या महासंचालक डॉ.पांढरपट्टे यांनी रविवारी गडचिरोली येथे नागपूर विभागातील जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, प्रवीण टाके, मनिषा सावळे, सचिन अडसूळ, अनिल गडेकर उपस्थित होते. त्यानंतर, दुपारच्या सत्रात त्यांनी धानोरा येथील आदिवासी मुलींच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास भेट दिली.

शासनाने २००८ पासून १० ते १४ वयोगटांतील शाळेत न गेलेल्या व मधून शाळा सोडलेल्या मुलींकरिता कस्तुरबा विद्यालय सुरू केले आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी हे विद्यालय सुरू आहेत. यातील शंभर टक्के निकाल देणाऱ्या व अनेक निराश्रितांच्या आयुष्याचा कायापालट करणाऱ्या धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वाढदिवसाचा हा एक अनोखा भावनिक सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेतील मुलींनी पारंपरिक रेला नृत्य करीत त्यांचे स्वागत केले. डॉ.पांढरपट्टे यांनी सर्व मुलींना यावेळी शैक्षणिक साहित्य भेट दिले.

मुलींशी संवाद साधताना ते म्हणाले, गडचिरोलीसारख्या भागात शिक्षण घेताय, म्हणून न्यूनगंड बाळगू नये. तुम्ही यापूर्वीच आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. येथील शैक्षणिक वातावरण व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेने ते सिद्ध झाले आहे. यापुढेही खूप शिका आणि मोठं व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी विद्यार्थिनींना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका दीपाली कुळमेथे यांनी केले. त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन शिक्षिका कीर्ती फुंडे यांनी केले तर आभार शिक्षिका श्रीमती कुथे यांनी मानले.

लेखा मेंढाला भेट

तत्पूर्वी त्यांनी ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या लेखा मेंढा या गावाला भेट देऊन ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी लेखा मेंढाच्या सरपंच नंदा दुगा यांनी गावाविषयीच्या कामकाजाची व ग्रामसभेबद्दलची माहिती दिली. लेखा मेंढा गावात झालेल्या कार्यक्रमाला सरपंचांसह ग्रामसभेचे अध्यक्ष अलीराम हिचामी, ग्रामसभा सचिव चरणदास तोफा, नरेश कुमोटी, मनिराम दुगा, आकांक्षित जिल्हा फेलो सुधाकार गवंडगावे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Students who went to Harkhoon to meet the Director General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.