मानव विकास मिशनमधून विद्यार्थिनींना सायकली मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:07 AM2021-03-13T05:07:01+5:302021-03-13T05:07:01+5:30
गावात शिक्षणाची सोय नसल्यास जिल्ह्यातील अनेक विद्यार्थिनींना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. शाळेपर्यंतचे अंतर पायी चालत असताना शैक्षणिक नुकसान होत ...
गावात शिक्षणाची सोय नसल्यास जिल्ह्यातील अनेक विद्यार्थिनींना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. शाळेपर्यंतचे अंतर पायी चालत असताना शैक्षणिक नुकसान होत असून शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. परिणामी, विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान हाेत असते. या सर्व बाबींचा विचार करून वर्ग ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मानव विकास अंतर्गत सायकलचे वितरण करण्यात येणार आहे.
याबाबत २०२० या वर्षासाठी नियोजन करण्यात आले असून ज्या शाळांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत त्यांना लाभ देण्यात येणार आहे. याविषयी १० मार्च शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या सभेत चर्चा करण्यात आली. यामध्ये आरमोरी तालुक्यातील एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करणार, अशी माहिती जि. प. सदस्य संपत आळे यांनी दिली.