राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचा पळसगावात अभ्यास दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:36 AM2021-07-29T04:36:23+5:302021-07-29T04:36:23+5:30
या अभ्यास दौऱ्यात राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी व विभागप्रमुख प्रा. गजानन बोरकर यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी प्रश्नावली तयार करून गावातील ...
या अभ्यास दौऱ्यात राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी व विभागप्रमुख प्रा. गजानन बोरकर यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी प्रश्नावली तयार करून गावातील लोकांशी हितगूज केले. विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधताना ग्रामपंचायत गावामध्ये मनरेगा अंतर्गत योजना आणण्यासाठी किती सक्रियपणे काम करते तसेच गावातील लोकांना रोजगाराच्या संधी किती प्रमाणात उपलब्ध होतात याविषयी लोकांचे मत जाणून घेतले. रोजगार सेवक गणेश मातेरे व सरपंच जयश्री दडमल यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी संवाद साधून मनरेगाच्या कार्याची माहिती विचारून गावाच्या विकासामध्ये नागरिकांचा किती सक्रिय सहभाग असतो याविषयी अध्ययन केले. दौऱ्याच्या यशस्वीतेकरिता प्रा. गजेंद्र कढव, ओमकार नखाते, गोपाल घोडाम, अनंतराज नखाते, अविनाश मंडपे, सुजल मोहूर्ले, पायल नखाते, दीक्षा कावळे, गायत्री कोल्हे यांनी परिश्रम घेतले.