उपविभागीय व तहसील कार्यालय पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 05:00 AM2022-04-07T05:00:00+5:302022-04-07T05:00:34+5:30

एसडीओ कार्यालय व तहसील कार्यालय ओस पडले आहेत. गडचिराेली व एटापल्ली येथे तिसऱ्याही दिवशी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच हाेता.  महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात येत नसल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येथे कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवर येत आहे. नायब तहसीलदार व वर्ग-३ चे कर्मचारी यामुळे त्रस्त आहेत. नायब तहसीलदार हे पद राज्यस्तरावरून भरण्याबाबतचा निर्णय रद्द करावा तसेच प्रलंबित समस्या लवकर मार्गी लावाव्या, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.

Sub-divisional and tehsil offices fell | उपविभागीय व तहसील कार्यालय पडले ओस

उपविभागीय व तहसील कार्यालय पडले ओस

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली/एटापल्ली : मागील दाेन वर्षांपासून मंडळ अधिकारी व अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती प्रक्रिया रखडली आहे. तसेच महसूल सहायकांची अनेक पदे रिक्त आहेत. पदाेन्नतीसह रिक्त पदे लवकर भरावी, या मागणीसाठी उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे एसडीओ कार्यालय व तहसील कार्यालय ओस पडले आहेत. गडचिराेली व एटापल्ली येथे तिसऱ्याही दिवशी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच हाेता. 
महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात येत नसल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येथे कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवर येत आहे. नायब तहसीलदार व वर्ग-३ चे कर्मचारी यामुळे त्रस्त आहेत. नायब तहसीलदार हे पद राज्यस्तरावरून भरण्याबाबतचा निर्णय रद्द करावा तसेच प्रलंबित समस्या लवकर मार्गी लावाव्या, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.
अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांना  नायब तहसीलदारपदी नियुक्ती द्यावी, तसेच महसूल सहायकांची रिक्त पदे भरावी, या मागणीसाठी गडचिराेली येथेही जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ४ एप्रिल राेजी आंदाेलनाच्या चाैथा टप्प्यानुसार निदर्शने करण्यात आली. या संपाला जिल्हा परिषद महासंघाने पाठिंबा दिला. दरम्यान मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, सत्यनारायण अनमदवार, देवेंद्र दहीकर, लतीफ पठाण, गजानन भांडारकर, धीरज जुमनाके, ज्ञानेश्वर ठाकरे, सुनील दिवसे, पांडुरंग राऊत, पीयूष आखाडे, वासुदेव मडावी, रंजना कुशुमवार, सोनाली कंकलवार, अर्चना  दुधबावरे, सुनीता शिवनकर यांच्यासह महसूल कर्मचारी संघटनेती सदस्य  उपस्थित होते.

एटापल्लीत पाळला संप
-    एटापल्ली येथील बेमुदत आंदोलनात पुनेश पोटावी, जे.जी. काडवाजीवार, विलास तुपट, जगदीश राठोड, संतोष करपे, रवी येरमे, दुष्यंत कोवे, जयदेव नारदेलवार, एस.डी. रेवेली, एम.एल. बंदुकवार, यशवंत दुर्गे, दीपक घागरगुंडे, संतोष माने, अनिल राठोड, आनंद वनकर, सुनील वेस्कडे, शारदा घुमडवार,मुन्ना खोब्रागडे, पुसू पुंगाटी आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
 

चामाेर्शीतील महसूल कर्मचारी संपावर

अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तसहीलदारपदी मागील दाेन वर्षांपासून पदाेन्नती हाेत नसल्याने तसेच महसूल सहायकांची पदे भरली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये राेष आहे. शासनाने मागण्या मान्य कराव्या, यासाठी चार टप्प्यांत आंदाेलन सुरू आहे. यादृष्टीने ४ एप्रिलपासून बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली. चामाेर्शी येथील तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये अव्वल कारकून एस. पी. शेख, किशाेर येरगुडे, आर. डी. भादेकर, शिपाई यमुना मंडरे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चारही टप्प्यात चामाेर्शीत आंदाेलन करण्यात आले. 

 

Web Title: Sub-divisional and tehsil offices fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.