सहा भरमार बंदुका केल्या जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:47 AM2017-10-25T00:47:49+5:302017-10-25T00:47:59+5:30

तालुक्यातील अतिसंवेदनशील असलेल्या कोठी गावात सीआरपीएफ व सिविल पोलिसांच्यावतीने सिविक अ‍ॅक्शन कार्यक्रमादरम्यान गावातील ५० ते ६० नागरिकांनी नक्षल्यांना मदत न करणे ....

Submit to the sixth bullet | सहा भरमार बंदुका केल्या जमा

सहा भरमार बंदुका केल्या जमा

Next
ठळक मुद्देनागरिकांनी नक्षल्यांना मदत न करणे व शस्त्र न उचलण्याचा संकल्प करीत सहा नागरिकांनी स्वत:कडील असलेल्या भरमार बंदुका पोलिसांच्या स्वाधीन केल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील अतिसंवेदनशील असलेल्या कोठी गावात सीआरपीएफ व सिविल पोलिसांच्यावतीने सिविक अ‍ॅक्शन कार्यक्रमादरम्यान गावातील ५० ते ६० नागरिकांनी नक्षल्यांना मदत न करणे व शस्त्र न उचलण्याचा संकल्प करीत सहा नागरिकांनी स्वत:कडील असलेल्या भरमार बंदुका पोलिसांच्या स्वाधीन केल्या.
गडचिरोली मुख्यालयापासून १८५ किमी अंतरावर असलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश कांबळे व ३८ बटालियन सीआरपीएफचे सहायक कमांडंट कुशलानंद शर्मा यांच्या नेतृत्वात पोलीस मदत केंद्रात सिविक अ‍ॅक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर गावातील नागरिकांनी नक्षल्यांना मदत न करण्याचा व शस्त्र न उचलण्याचा संकल्प करीत गावातील सहा नागरिकांनी पोलिसांंपुढे जमा केल्या.
यावेळी केंद्रीय रिजर्व पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक संजय कुमार यादव, सहायक उप निरीक्षक विजयानंद एम.के. पोलिस उपनिरीक्षक योगीराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक दयानंद वनवे यांच्यासह पोलिस कर्मचारी व सीआरपीफचे जवाने उपस्थित होते.

Web Title: Submit to the sixth bullet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.