सकारात्मकतेने यशाची प्राप्ती

By admin | Published: May 22, 2014 01:08 AM2014-05-22T01:08:41+5:302014-05-22T01:08:41+5:30

रडत रडत जगण्यापेक्षा लढत लढत जगावे,

Successfully attain success | सकारात्मकतेने यशाची प्राप्ती

सकारात्मकतेने यशाची प्राप्ती

Next

गडचिरोली : रडत रडत जगण्यापेक्षा लढत लढत जगावे, प्रत्येक क्षण युद्धाने माखलेला आहे. येथे आराम नाही, ३0 वर्षानंतर काहीच करता येणार नाही. स्पध्रेत बुद्धीवंत व धनाड्य लोकांशी संघर्ष कराचा आहे, त्यासाठी केवळ तीन वर्ष कठोर परिo्रम करून अभ्यास केल्यास व त्याला सकारात्मक दृष्टीकोणाची साथ लाभल्यास हमखास यश प्राप्त होतो, असे प्रतिपादन माजी प्रधान सचिव किशोर गजभिये यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत पार्टी पुणेच्या सौजन्यांने युपीएससी सेंटरच्या प्रशिक्षणार्थीना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन सभागृहात आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते तर प्रमुख अतिथी म्हणून अभियंता वसंत रामटेके, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. बा. स. राठोड, ग्रंथपाल डॉ. o्रीकांत रोकडे, विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. ईश्‍वर मोहुर्ले, डॉ. दिलीप बारसागडे, डॉ. पंडीत फुलझेले आदी मान्यवर उपस्थित होते. ,

यावेळी मार्गदर्शन करतांना किशोर गजभिये म्हणाले की, लायकी नसलेल्या माणसांचा कधीच सल्ला घेऊ नका, एक उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून आयुष्याचा ताबा तुम्हीच घ्या, स्वत:चे शिल्पकार स्वत:च बना, रात्रीचे स्वप्न नेहमीच पूर्ण होत नसतात. म्हणून दिवसाढवळ्या स्वप्ने बघा, जे विचार कराल, तेच घडेल, टिकाकार कधीच मोठा होत नाही, असे मार्गदर्शन केले. संचालन केंद्र समन्वयक प्रा. राजन बोरकर तर आभार डॉ. ईश्‍वर मोहुर्ले यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Successfully attain success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.