नोकरीत सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 01:36 AM2019-03-02T01:36:53+5:302019-03-02T01:38:38+5:30
अनुकंपाधारकांना वनविभागाने नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी अनुकंपाधारकांनी गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर १ मार्चपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. मागण्यांचे निवेदन मुख्य वनसंरक्षक यांना देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अनुकंपाधारकांना वनविभागाने नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी अनुकंपाधारकांनी गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर १ मार्चपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. मागण्यांचे निवेदन मुख्य वनसंरक्षक यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, २०१९ ला पेसा नसलेल्या वनरक्षक भरती प्रक्रियेमध्ये अनुकंपाधारकांना प्रथम प्राधान्य द्यावे, सरळ सेवा भरती न करता १०० टक्के अनुकंपा धारकांना प्रथम प्राधान्य द्यावे, २०१५ ते २०१७ मध्ये अनुकंपा कोट्यातून पद करण्यात आले नाही. तरी अनुकंपाधारकांची पदे तत्काळ रद्द करावी, जे अनुकंपाधारक वयोमर्यादेतून बाद झाली आहेत व बाद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या जागेवर त्यांच्या वारसदारांचे नाव अनुकंपा प्रतीक्षा यादीत समाविष्ट करावे, ज्या अनुकंपाधारकाच्या कुटुंबाला पेंशन लागू नाही अशा कुटुंबाला १० लाख रूपयांची मदत द्यावी आदी मागण्यांसाठी १ मार्चपासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
मनोज दादाजी नरूले, महेश मनोहर चौधरी, देविदास देवराव मेश्राम, सुनील पोचम कप्पलवार, राकेश दिलीप नागूलवार, अमोल येमाजी पोरटे यांनी सहभाग घेतला आहे.