चर्चमध्ये पत्नीची हत्या करून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 05:07 AM2018-08-05T05:07:29+5:302018-08-05T05:07:32+5:30

पत्नीच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून तिची हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आलापल्ली येथील चर्चमध्ये शनिवारी सकाळी उघडकीस आली.

Suicide by killing wife in church | चर्चमध्ये पत्नीची हत्या करून केली आत्महत्या

चर्चमध्ये पत्नीची हत्या करून केली आत्महत्या

Next

आलापल्ली (गडचिरोली) : पत्नीच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून तिची हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आलापल्ली येथील चर्चमध्ये शनिवारी सकाळी उघडकीस आली. संशयी वृत्तीमुळे उद्भवलेल्या कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. हे दाम्पत्य चर्चमध्येच झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर हा थरार घडला.
मोनिका संजय भोगेवार (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. संजयने मोनिकाचा झोपेतच खून केल्यानंतर पंख्याला गळफास लावून घेतल्याचा अंदाज आहे. प्राप्त माहितीनुसार, आलापल्ली येथील भामरागड मार्गावरील मनेवार कॉलनीत राहणारा संजय मोलमजुरीचे काम करायचा. तो नेहमी पत्नीवर संशय घ्यायचा. यामुळे अनेकदा त्यांच्याच भांडण व्हायचे. काही काळ दोघे विभक्तही राहात होते, पण नंतर समेट घडून आल्याने पुन्हा एकत्र नांदायला लागले. त्यानंतर मन:स्थिती ठीक नसेल तेव्हा दोघेही गोंडमोहल्ला भागात असलेल्या चर्चमध्ये रात्री मुक्काम करायचे. या चर्चमध्ये अनेकदा गरजू लोक रात्री आश्रयाला असतात. नेहमीप्रमाणे ते चर्चमध्ये मुक्कामाला आले होते त्यामुळे चर्चमध्येच वरच्या माळ्यावर राहणाऱ्या फादर यांच्यासुद्धा ही गोष्ट लक्षात आली नाही. या दाम्पत्याचा ३ वर्षांचा मुलगाही तिथे होता. सकाळी तो झोपेतून उठल्यावर हा प्रकार लक्षात आला.

Web Title: Suicide by killing wife in church

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.