गळफास घेऊन सेवानिवृत्त तलाठ्याची आत्महत्या
By admin | Published: September 18, 2015 01:18 AM2015-09-18T01:18:33+5:302015-09-18T01:18:33+5:30
येथील चामोर्शी मार्गावर वास्तव्यास असलेल्या अनिल क्रिष्णा आसूटकर (५०) यांनी राहत्या घरी सिलिंग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.
आष्टी : येथील चामोर्शी मार्गावर वास्तव्यास असलेल्या अनिल क्रिष्णा आसूटकर (५०) यांनी राहत्या घरी सिलिंग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.
पोळा सणानिमित्त आसूटकर यांचे कुटुंब चंद्रपूर येथे गेले असता, अनिल आसूटकर यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने त्यांना चंद्रपूर येथील खासगी डॉक्टरकडे उपचारार्थ दाखल केले होते. मात्र अनिल हा आष्टी येथे निघून आला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पंख्याला दोरीने बांधून आत्महत्या केली. घराचे दरवाजे बंद असल्याने दोन दिवस माहित पडले नाही. मात्र गुरूवारी सकाळी खोलीमधून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी दरवाजा उघडला असता, आसूटकर हे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. आसूटकर हे सावली तालुक्यातील पालेबारसा येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. आठ महिन्यांपूर्वी त्यांनी एच्छिक सेवानिवृत्ती घेतली होती. या घटनेचा पुढील तपास बिट अमलदार पोटवार, पोलीस हवालदार प्रमोद उंदीरवाडे करीत आहेत. (प्रतिनिधी)