Sukanya Samriddhi Yojana : ‘सुकन्या’चे खाते काढा अन् पोरीच्या भविष्याची चिंता सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 03:11 PM2022-07-26T15:11:21+5:302022-07-26T15:24:02+5:30

दहा वर्षांखालील मुलींसाठी याेजना, १८ आणि २१ व्या वर्षी मिळणार रक्कम; शिक्षण व लग्नासाठीचे भविष्य सुरक्षित

Sukanya Samriddhi Yojana : Future secured for daughters education and marriage, amount to be received at 18 and 21 years | Sukanya Samriddhi Yojana : ‘सुकन्या’चे खाते काढा अन् पोरीच्या भविष्याची चिंता सोडा

Sukanya Samriddhi Yojana : ‘सुकन्या’चे खाते काढा अन् पोरीच्या भविष्याची चिंता सोडा

Next

गडचिराेली : सर्वसामान्य लाेकांना आपल्या मुलीच्या विवाहासाठी तसेच शैक्षणिक खर्चासाठी भविष्यातील आर्थिक तरतूद करता यावी, यासाठी केंद्र शासनाने २२ जानेवारी २०१५ राेजी सुकन्या समृद्धी याेजना सुरू केली. ही याेजना मुलींसाठी असून सर्वात कमी गुंतवणुकीत बचतीची याेजना आहे. सदर याेजनेला पंतप्रधान सुकन्या याेजनासुद्धा म्हटले जाते.

केंद्र व राज्य शासनामार्फत बॅंक किंवा पाेस्ट कार्यालयामार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या याेजना राबविल्या जातात. त्यापैकीच ही याेजना आहे. पाेस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये मुलीच्या नावे बचत खाते उघडता येते. किमान २५० रुपये ते जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करून ही याेजना सुरू करता येते. खाते उघडल्यापासून ते मुलीच्या वयाचे २१ वर्षे पूर्ण हाेईपर्यंत याेजनेची मॅच्युरिटी हाेते. चांगल्या व्याजदराने ठेवीचा परतावा हाेताे. त्यामुळे सदर याेजनेबाबत ‘सुकन्या’चे खाते काढा अन् पोरीच्या भविष्याची चिंता सोडा, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आवश्यक कागदपत्रे काय

सुकन्या समृद्धीचा याेजनेचा लाभ घेण्यासाठी याेजनेचा अर्ज, मुलीचा जन्म दाखला, आधारकार्ड, पालकांचे पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, वीजबिल आदी कागदपत्र आवश्यक आहे. सदर कागदपत्रे पालकांकडे असावी तेव्हाच खाते उघडता येते.

वर्षाला ७.६ टक्के व्याज

सुकन्या समृद्धी याेजनेची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या वर्षी ९.१ टक्के व्याजदर हाेते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी व्याजदर भर पडली. परंतु त्यानंतर मात्र व्याजदर घसरला. सध्या ७.६ टक्के याेजनेअंतर्गत ठेवी असणाऱ्यांना मिळत आहे.

...तर खाते हाेईल बंद

मुलीच्या वयाची २१ वर्षे पूर्ण हाेण्यापूर्वी तिचे लग्न झाले तर सुकन्या समृद्धी याेजनेचे खाते आपाेआप बंद हाेते. मॅच्युरिटीनंतरच म्हणजेच वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही खाते सुरूच ठेवल्यास चालू व्याजदर मिळत राहताे.

सुकन्या समृद्धी याेजना फायदेशीर असून सर्वसामान्य नागरिक या याेजनेच्या माध्यमातून मुलीच्या भविष्यासाठी पैशांची बचत करू शकताे. दर महिन्याला सहज शक्य हाेतील ऐवढे पैसे बॅंक किंवा पाेस्टात जमा केल्यास बरीच बचत हाेऊ शकते. याचा लाभ इतर नागरिकांनी घ्यावा.

- घनश्याम बुरांडे, पालक

Web Title: Sukanya Samriddhi Yojana : Future secured for daughters education and marriage, amount to be received at 18 and 21 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.