भामरागडात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:20 PM2019-04-22T22:20:25+5:302019-04-22T22:20:46+5:30

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्याना व्यक्तीमत्व विकासासाठी शहरांमध्ये समर कॅम्पचे आयोजन केले जाते. परंतू भामरागडसारख्या आदिवासी तालुक्यातील पालकांची समर कॅम्पसाठी पैसे मोजण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे या तालुक्यामध्ये समर कॅम्पचे आयोजन करण्यास कोणतीही संस्था तयार होत नाही. मात्र समर कॅम्पचे महत्त्व लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दल व गट साधन केंद्र भामरागडने पुढाकार घेतला आहे.

Summer camp for tribal students in Bhamrangad | भामरागडात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प

भामरागडात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प

googlenewsNext
ठळक मुद्दे११७६ विद्यार्थ्यांचा सहभाग : पोलीस दल व गट साधन केंद्राचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्याना व्यक्तीमत्व विकासासाठी शहरांमध्ये समर कॅम्पचे आयोजन केले जाते. परंतू भामरागडसारख्या आदिवासी तालुक्यातील पालकांची समर कॅम्पसाठी पैसे मोजण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे या तालुक्यामध्ये समर कॅम्पचे आयोजन करण्यास कोणतीही संस्था तयार होत नाही. मात्र समर कॅम्पचे महत्त्व लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दल व गट साधन केंद्र भामरागडने पुढाकार घेतला आहे.
२२ ते २४ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील सहा ठिकाणी नि:शुल्क समर कॅम्पचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याचीही सोय करण्यात आली असल्याने या समर कॅम्पला ‘विशेष विद्यार्थी बाल आनंद निवास शिबिर’ असे नाव देण्यात आले आहे.
भामरागड तालुक्यातील भामरागड, गोंगवाडा, लाहेरी, नारगुंडा, ताडगाव, मन्नेराजाराम या केंद्रांवर एकाच वेळी शिबिरांचे आयोजन केले आहे. शिबिरांचे उद्घाटन सोमवारी (दि.२२) झाले. याप्रसंगी धोडराजचे पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत काळे, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावने, गोंगवाडाचे केंद्र प्रमुख भाऊराव निखाडे, समन्वयक राज वाळवी, कैलास जगने, धनराज पोरटे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन चांगदेव सोरते तर आभार राजू धात्रक यांनी मानले. सहाही केंद्रांवर सुमारे १ हजार १७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. दुसरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी या आनंद निवासी शिबिरात सहभागी होणार आहेत. पोलिसांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना कलर बॉक्स, नोटबूक, बालपेन, साबन, हेअर आॅईल, पावडर, स्केच पेन, मार्कर पेन आदी साहित्यांचे वितरण करण्यात आले.
अशी आहे दिनचर्या
सकाळी ५.३० ते ६.३० वाजेपर्यंत योगाचे प्रशिक्षण दिले जाईल. सकाळी ६.३० ते ८.३० पर्यंत आंघोळ व इतर कार्यासाठी वेळ दिला जाईल. ८.३० ते ९ वाजेपर्यंत सकाळचा नास्ता, ९ ते ९.४५ वाजेपर्यंत आदर्श परिपाठ, ९.४५ ते १० वाजेपर्यंत ग्रुप निर्मिती व सवंगडी परिचय, १० ते ११ वाजेपर्यंत खेळ व कृतीयुक्त गीत, ११.३० ते १ वाजेपर्यंत भाष व गणित विषयाशी सुसंगत उपक्रम, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत दुपारची विश्रांती, दुपारी ३ ते ३.४५ पर्यंत पेपर आर्ट, ३.४५ ते ४.३० वाजेपर्यंत स्टोरी तयार करणे, ४.३० ते ५ वाजेपर्यंत कृतीशील गीते, टायर गेम, ५.२० ते ५.५० पर्यंत साखळी पूर्ण करणे, ५.५० ते ६.३० पर्यंत शब्दांची शर्यत, अंताक्षरी खेळणे, ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत जेवन, ८.३० ते १० वाजेपर्यंत सकारात्मक व प्रेरणादायी उपक्रमांवर चित्रपट दाखविले जातील.

Web Title: Summer camp for tribal students in Bhamrangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.