उन्हाळी धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:39+5:302021-07-02T04:25:39+5:30
शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १ हजार ८६८ रुपये भाव मिळते. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा शासकीय धान खरेदी ...
शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १ हजार ८६८ रुपये भाव मिळते. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्याकडे कल असताे. शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाइन करून धान विक्रीच्या प्रतीक्षेत असतानाच उपलब्ध गोडाऊन फुल्ल झाल्याने धान खरेदी थांबविण्यात आली होती.
एकीकडे गोडाऊनची कमतरता तर दुसरीकडे धान खरेदीची अंतिम तारीख ३० जूनच असल्याने येथील धान खरेदी विक्रीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याशी थेट संपर्क साधून येथील समस्या अवगत करून दिली होती.
तथापि धान खरेदी केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येत असल्याने ना.भुजबळ यांनी केंद्राकडे तशी मागणी केली असता केंद्र शासनाने रब्बी धान खरेदीची मुदतवाढ ३१ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे.