उन्हाळ्यातील टाकाऊ वस्तू नदीपात्रात
By admin | Published: May 27, 2014 11:43 PM2014-05-27T23:43:52+5:302014-05-27T23:43:52+5:30
उन्हाळ्यात टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट अनेक शहरात ठिकाणी लावली जाते. परंतु टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावतांना नदीपात्र, तलाव, बोड्या यांचा सर्वाधिक वापर केला जातो. स्वच्छ सुंदर असलेल्या
गडचिरोली : उन्हाळ्यात टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट अनेक शहरात ठिकाणी लावली जाते. परंतु टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावतांना नदीपात्र, तलाव, बोड्या यांचा सर्वाधिक वापर केला जातो. स्वच्छ सुंदर असलेल्या नदीपात्रात, तलाव-नाल्याच्या ठिकाणी सार्वजनिक मोकळय़ा जागेत गावातील टाकाऊ साहित्य, गावातील नाल्याचा उपसा केलेला गाळ, घरातील केरकचरा, काचेच्या प्लॉस्टीकच्या बाटला व इजा करणार्या वस्तू टाकल्या जातात. त्यामुळे नदी-नाल्याचे जलस्त्रोत दुषित होतात. पाडलेल्या इमारतींचे टाकाऊ साहित्य तलाव, बोडी व नदीपात्रात तसेच शहरालगत असलेल्या मोकळय़ा जागेत टाकले जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात जनावरे व नागरिकांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात टाकाऊ वस्तू बाहेर फेकण्यासंदर्भात निर्बंध असणे आवश्यक आहे. स्वत:च्या घराचे जीर्ण सिमेंटचे छत तोडून टाकाऊ साहित्य, तसेच प्लॉस्टीक, फायबर वस्तूंचे मोडकळीस आलेले साहित्य बाहेर फेकले जातात. त्यामुळे नदीचे पात्र व तलाव, बोडींचे खोल असलेले पात्र भरण्याच्या मार्गावर आले आहे. सिमेंट, गिट्टीसह असलेले साहित्य पावसाळय़ातही वाहून जात नाही. त्यामुळे नदीपात्रातच टाकाऊ साहित्याचा थर जमा होत असतो. परिणामी खोल असलेले नदीपात्र खोल असलेले नदीपात्र उथळ होत आहे. या घाटावर शेतकरी आपले बैल धुण्यासाठी तसेच महिलाही कपडे धुण्यासाठी येत असतात. त्यामुळे महिला व पुरूषांना याचा त्रास होत असतो. नदीपात्रात टाकाऊ साहित्य टाकणार्या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली जात आहे. रेती घाटावर नाल्यांचा उपसा केलेली घाणमाती नदीपात्रात टाकल्या जात आहे. त्यात दगड, काच, लोखंडी तार असल्याने नदीपात्रात नागरिकांना धोका निर्माण झाला होता. घातक साहित्यामुळे दीर्घकाळपर्यंत नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नदीपात्रात ट्रॅक्टर सहजतेने जाण्यासाठी माती, मुरूम, दगड नदीपात्रात टाकतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या स्वच्छ सुंदर असलेले नदीपात्र खराब होते. गौण खनिजावर करोड रूपयाचा महसूल मिळविणारे विभाग असे अघोरी कृत्य करणार्या लोकांवर कोणतीही कारवाई करत नाही. नदीपात्र व तलाव, बोडी यासह अनेक जलस्त्रोतांमध्ये मानवी प्रकोपाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. अवैध व नियमबाहय़ होणारे गौण उत्खनन तसेच नैसर्गिकरित्या स्वच्छ असलेल्या नदीपात्रात नाल्यांचा उपसा केलली माती, मुरूम, दगड इतर टाकावू साहित्य टाकून खराब केले जाते. (शहर प्रतिनिधी)