पोलीस अधीक्षकांचा होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:59 PM2018-04-25T23:59:25+5:302018-04-25T23:59:25+5:30

नक्षल्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह जिल्हा पोलीस दलाच्या विविध विभागात कार्यरत चार पोलीस शिपायांना उत्तम कामगिरीबद्दल २०१७ या वर्षाकरीता महासंचालकांचे बोधचिन्ह/ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

The Superintendent of Police will be honored | पोलीस अधीक्षकांचा होणार गौरव

पोलीस अधीक्षकांचा होणार गौरव

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह जिल्हा पोलीस दलाच्या विविध विभागात कार्यरत चार पोलीस शिपायांना उत्तम कामगिरीबद्दल २०१७ या वर्षाकरीता महासंचालकांचे बोधचिन्ह/ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील ५७१ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मंगळवारी पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस नाईक श्रीनिवास कंदीकुरवार, पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस शिपाई जितेंद्र मारगाये, गजेंद्र हिचामी व राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत पोलीस शिपाई मधुकर हनुमंतू आचेवार यांना पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित संचलनाच्यावेळी सन्मानचिन्ह प्रदान करण्याचे आदेश दिले आहेत. उल्लेखनिय कामगिरी करणाºया पोलीस जवानांचा गौरव महाराष्टÑ दिनी केला जातो.

Web Title: The Superintendent of Police will be honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस