चामोर्शी तालुक्यात १६८ निराधारांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:51 AM2021-02-26T04:51:08+5:302021-02-26T04:51:08+5:30

निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा, परित्यक्त्या, अनाथ बालके इत्यादींचे जीवनमान सुसह्य ...

Support to 168 destitute people in Chamorshi taluka | चामोर्शी तालुक्यात १६८ निराधारांना आधार

चामोर्शी तालुक्यात १६८ निराधारांना आधार

googlenewsNext

निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा, परित्यक्त्या, अनाथ बालके इत्यादींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसाहाय्य देण्यात येते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता चामोर्शी तालुक्यातील महाराजस्व अभियान तथा समाधान शिबिरांतर्गत जनजागृती करून संबंधित व्यक्तींकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. दि. २३ फेब्रुवारी रोजी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा चामोर्शीचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार दिलीप दुधबळे, लिपिक डी.सी. सहारे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत निकाली काढण्यात आले.

संजय गांधी योजना समितीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनेंतर्गत एकूण १७७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १६८ अर्ज मंजूर करण्यात आले. नऊ अर्ज नामंजूर करण्यात आले.

Web Title: Support to 168 destitute people in Chamorshi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.