आशांचा अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:48 PM2017-09-24T23:48:29+5:302017-09-24T23:48:43+5:30
अंगणवाडी कर्मचाºयांचा संप शमविण्यासाठी शासनाने अंगणवाडी उघडण्याचे अधिकार आशा वर्करला देणारा शासन परिपत्रक २० सप्टेंबर रोजी काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अंगणवाडी कर्मचाºयांचा संप शमविण्यासाठी शासनाने अंगणवाडी उघडण्याचे अधिकार आशा वर्करला देणारा शासन परिपत्रक २० सप्टेंबर रोजी काढला. मात्र आशा वर्कर महिलांनी अंगणवाडी उघडण्यास स्पष्ट नकार दिला असून रविवारी देसाईगंज येथे शासन परिपत्रकाची होळी केली.
आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेचे सचिव विनय झोडगे यांच्या नेतृत्वात रविवारी आंदोलन करण्यात आले. आशा वर्कर तसेच अंगणवाडी कर्मचाºयांनाही शासन अतिशय कमी मानधन देत आहे. दोन कर्मचाºयांमध्ये भांडण लावण्याच्या उद्देशाने शासनाने शासन परिपत्रक काढले आहे. शासनाने अत्यंत कमी वाढ दिली असून ही वाढ अंगणवाडी कर्मचाºयांना मान्य नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांनी संप चालूच ठेवला आहे. देसाईगंज येथील आंदोलनात अंगणवाडी कर्मचारीही सहभागी झाले होते. या संपाला आशा वर्करचाही पाठिंबा असून आशा वर्कर अंगणवाडी उघडणार नाही. हे शासनाला दाखवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात निदर्शने देऊन जोपर्यंत अंगणवाडी संघटनेने सुचविलेली मानधन वाढ शासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात आयटकच्या तालुका अध्यक्ष हिरकन्या रामटेके, सचिव ज्योसना रामटेके, मंगला ढोरे, दीपिका गुरनुले, विद्या सहारे, लता नंदेश्वर, संध्या बोदेले, वर्षा सूर्यवंशी उपस्थित होत्या. आशा वर्करने अंगणवाडी उघडण्यास नकार दिला असल्याने अंगणवाडी कर्मचाºयांचा संप मिटतपर्यंत अंगणवाड्या बंदच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.