ओबीसी महामाेर्चाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:39 AM2021-02-09T04:39:09+5:302021-02-09T04:39:09+5:30
ओबीसी महामोर्चात सोनार समाजाचा सहभाग ओबीसी समाजाच्या संवैधानिक न्याय्य मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढल्या जाणाऱ्या माेर्चात साेनार समाज ...
ओबीसी महामोर्चात सोनार समाजाचा सहभाग
ओबीसी समाजाच्या संवैधानिक न्याय्य मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढल्या जाणाऱ्या माेर्चात साेनार समाज सहभागी हाेणार आहे. सोनार समाज संघटनेचे अध्यक्ष बंडूजी कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक घेऊन माेर्चात सहभागी हाेण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करणे तसेच समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. एसी, एसटी प्रमाणे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावे यासह विविध मागण्यांसाठी काढण्यात येणाऱ्या माेर्चात ओबीसी बांधवांसह सर्व सोनार समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीतून करण्यात आले. बैठकीला सोनार समाज संघटनेचे सचिव अशोक हाडगे, उपाध्यक्ष डेडूजी बेहरे, महिला उपाध्यक्ष अल्का खरवडे, राजू कावळे, सेवानिवृत्त शिक्षक अरुण पोगळे, ललीत पोगरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेवराव काळबांधे, पंकज हर्षे, दिलीप काळबांधे, दत्तात्रय खरवडे आदी उपस्थित होते.
खैरे कुणबी विकास परिवार
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या महामाेर्चाला खैरे कुणबी विकास परिवाराने पाठिंबा दर्शविला आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करावे तसेच प्रलंबित प्रश्न साेडवावेत आदी मागण्या माेर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. त्यामुळे या माेर्चात जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खैरे कुणबी विकास परिवाराचे गडचिराेली शाखाध्यक्ष प्रभाकर कुबडे यांनी केले आहे.