गडचिरोलीतील सूरज मेहता इंडियन टॅलेंट परीक्षेत राज्यात सहावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:13 PM2018-03-30T12:13:47+5:302018-03-30T12:13:57+5:30
घोट येथील नवोदय मराठी उच्च प्राथमिक विद्यालयात ४ थ्या वर्गात शिकणाऱ्या सूरज अशोक मेहता या विद्याथ्याने २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट परीक्षेत गणित या विषयात राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: घोट येथील नवोदय मराठी उच्च प्राथमिक विद्यालयात ४ थ्या वर्गात शिकणाऱ्या सूरज अशोक मेहता या विद्याथ्याने २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट परीक्षेत गणित या विषयात राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. याचसोबत अथर्व वैजे, स्वर बटराखाये आणि न्यूटन प्रशांत सरकार एक्सलन्स अवॉर्ड तर नयना भाऊराव मेहर, अथर्व बटराखाये, अमन गुरनुले, शशांक गणवीर, साक्षी कन्नाके यांना क्लास टॉपर अवॉर्ड मिळाला. ही परीक्षा दोन राऊंडमध्ये घेण्यात आली असून पहिल्या राऊंडमध्ये राज्यातील ४८ विद्यार्थी सहभागी झाले होते.
हे पुरस्कारप्राप्त विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व आईवडिलांना देतात. शाळेच्या मुख्याध्यापिका विजयश्री अगडे व शिक्षकांनी या मुलांचे कौतुक केले आहे.