सुरेश डंबोळे नातू फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित

By admin | Published: January 12, 2017 12:52 AM2017-01-12T00:52:59+5:302017-01-12T00:52:59+5:30

पुण्याच्या नातू फाऊंडेशनच्या वतीने सुलोचना नातू स्मृती सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार देऊन अहेरी येथील डॉ. सुरेश डंबोळे यांना सोमवारी सन्मानित करण्यात आले.

Suresh Dambole is awarded the Natu Foundation Award | सुरेश डंबोळे नातू फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित

सुरेश डंबोळे नातू फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित

Next

आदिवासी क्षेत्रातील कार्यासाठी गौरव : हिंमतराव बावस्करांच्या उपस्थितीत वितरण
अहेरी : पुण्याच्या नातू फाऊंडेशनच्या वतीने सुलोचना नातू स्मृती सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार देऊन अहेरी येथील डॉ. सुरेश डंबोळे यांना सोमवारी सन्मानित करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीतील डॉ. हेडगेवार जन्माशताब्दी सेवा समितीमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा कार्य करणारे डॉ. सुरेश डंबोळे यांना यंदाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंचवीस हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला फाऊंडेशनचे प्रमुख विश्वस्त दत्ता टोळ व चंद्रशेखर यार्दी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हिंमतराव बावस्कर होते. याप्रसंगी डॉ. डंबोळे यांनी मेळघाट, अहेरी या भागांमध्ये ते करत असलेल्या कामाची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांना आलेल्या अनेक विलक्षण अनुभवांचे कथनही केले. यावेळी डॉ. हेडगेवार रक्तपेढी, ज्ञानप्रबोधिनी हराळी केंद्र, भारतमाता आदिवासी पारधी समाज भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान, छात्र प्रबोधन, रामकृष्ण आश्रम, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, संत सेवा संघ, अहिल्यादेवी हायस्कूल या संस्थांना आर्थिक मदतही करण्यात आली, असा उल्लेख त्यांनी केला.
या कार्यक्रमात नातू फाऊंडेशनचा महादेव बळवंत नातू पुरस्कार डॉ. धनंजय केळकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Suresh Dambole is awarded the Natu Foundation Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.