सर्चमध्ये ९४ रूग्णांवर शस्त्रक्रिया

By admin | Published: September 17, 2015 01:45 AM2015-09-17T01:45:36+5:302015-09-17T01:45:36+5:30

शोधग्राम सर्च येथील मॉ दंतेश्वरी दवाखान्यात तीन दिवसीय शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.

Surgery of 94 patients in search | सर्चमध्ये ९४ रूग्णांवर शस्त्रक्रिया

सर्चमध्ये ९४ रूग्णांवर शस्त्रक्रिया

Next

तीन दिवसीय शिबिर : विविध आजारांच्या रूग्णांना मिळाला लाभ
गडचिरोली : शोधग्राम सर्च येथील मॉ दंतेश्वरी दवाखान्यात तीन दिवसीय शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शिबिरात विविध आजारांच्या ९४ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
चातगाव येथे पार पडलेल्या शिबिरात हर्निया, अंडवृद्धी, गर्भाशयाचे आजार, शरीरावरील गाठी, मुतखडा, थायराईडची गाठ, मासिक पाळी अधिक जाणे, हायपोस्पिडीयासीस, अपेंडिक्स व लहान मुलांवरील आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यात अनेक जुने आजार असलेले काही रूग्ण समाविष्ट होते. शिबिरात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, राजनांदगाव, कांकेर आदी जिल्ह्यातून रूग्ण शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले होते. विविध प्रकारच्या व्याधी असलेल्या रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने शिबिरातील रूग्णांना मोठा दिलासा मिळाला. शिबिरात डॉक्टरांकडून नियमित तपासणी, अत्यल्प शुल्क, निवास व्यवस्था, शिबिरपूर्व व नंतरची काळजी आदींसह अनेक सुविधा पुरविण्यात आल्याने अनेक रूग्णांनी समाधान व्यक्त केले.
शस्त्रक्रियेकरिता सांगली येथील पीडियायाट्रिक व जनरल सर्जन डॉ. रवींद्र व्होरा, डॉ. महेंद्र ताम्हणे, डॉ. महेश प्रभु, बालरोगतज्ज्ञ डॉ. पराग टापरे, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सविता मोहिते, भूलतज्ज्ञ डॉ. किरण भिंगार्डे, डॉ. शरयु बेलापुरे, डॉ. राजा पाटील यांच्यासह इतर २२ तज्ज्ञ उपस्थित होते. शिबिरादरम्यान डॉ. राणी बंग, मृणाल कालकोंडे, डॉ. योगेश कालकोंडे, डॉ. वैभव तातावार, दंतरोगतज्ज्ञ डॉ. चेतना सोयाम, डॉ. वर्षा पवार, डॉ. तरू शहा, अश्लेषा बल्लाळ, अविनाश गिरी, नंदा सुर्वे, करिश्मा उसेंडी, विशाखा नगराळे, पुष्पा मंगर, उषा पुडो, जयवंता कल्लो, रेश्मा बारसागडे, रंजिता डे, रंजिता तुलावी, ललिता आतला, रवींद्र भुसारी, प्रभाकर उमरगुंडावार, संजय दरडमारे, प्रकाश राऊत, अविनाश कुमरे, रोहित साखरे व सर्चमधील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Surgery of 94 patients in search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.