शस्त्रक्रियेत फसवणूक केली नाही
By admin | Published: September 28, 2016 02:24 AM2016-09-28T02:24:03+5:302016-09-28T02:24:03+5:30
सरस्वती श्यामसुंदर भोयर (६५) यांच्या शस्त्रक्रियेत कोणतीही फसवणूक केलेली नाही.
पत्रकार परिषद : शिवनाथ कुंभारे यांचा दावा
गडचिरोली : सरस्वती श्यामसुंदर भोयर (६५) यांच्या शस्त्रक्रियेत कोणतीही फसवणूक केलेली नाही. वर्तमानपत्रामध्ये वृत्त प्रकाशित करून हॉस्पीटलला हेतूपुस्सर बदनाम करण्याचे काम केले जात आहे, असा दावा धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल गडचिरोलीचे संचालक डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
या संदर्भात माहिती देताना डॉ. कुंभारे, डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. विवेक आत्राम व डॉ. अनंत कुंभारे म्हणाले की, सरस्वती श्यामसुंदर भोयर (६५) यांची सोनोग्राफी डॉ. अनंत कुंभारे यांनी ६ जुलै २०१६ ला केली. सोनोग्राफीमध्ये चार लिटर पाणी असलेला गोळा दिसला. ओव्हेरीयन सिप्ट या असे त्या गोळ्याचे निदान झाले व रिपोर्ट दिला गेला. पेशंटला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दिपचंद सोयाम व डॉ. यशवंत दुर्गे यांनी तपासले. दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांनी आॅपरेशनचा सल्ला दिला. १८ जुलै २०१६ ला डॉ. यशवंत दुर्गे यांनी आॅपरेशन केले. डॉ. विवेक आत्राम यांनी सुंगनी दिली, असे सांगितले. दरम्यान या पत्रकार परिषदेत डॉ. दुर्गे यांनी आॅपरेशनमधील तांत्रिक बाबींची माहिती दिली. लघवीच्या पिशवीमध्ये चार लिटर पाणी होते. सेप्टम होते. लघवीचे छिद्र निमुळते होते. डॉक्टरांनी नळी टाकली. लघवीच्या पिशवीच्या संवेदना व टोन नव्हते. पेशंटचे वय ६५ वर्ष असल्याने सध्या प्रकृती सुधारत आहे. डॉ. दुर्गे यांच्या देखरेखीखाली पेशंट आहे. अंदाजे २२ हजार रूपये खर्च येईल, असे नातलगांना सांगण्यात आले. नातलगांकडून आॅपरेशनला मान्यता देण्यात आली. पेशंटला २३ जुलै २०१६ ला सुटी देण्यात आली. पुन्हा तिला चार दिवस भरती ठेवावे लागले. परत त्यांना पाच हजार रूपये खर्च आला. त्यामुळे शस्त्रक्रियेत डॉ. कुंभारे यांनी फसवणूक केली, हे वामन भोयर यांचे म्हणणे तथ्यहिन आहे. दवाखान्याला व व्यक्तीला बदनाम करण्यासाठी वर्तमानपत्र बातम्या देत आहे, असे मत डॉ. कुंभारे यांनी यावेळी केले. वयोमानाने रिकर्व्हर व्हायला वेळ लागू शकतो. औषधोपचाराचा खर्चही लागू शकतो, हे सत्य आहे. मात्र यात पेशंटीची फसवणूक झालेली नाही. यावेळी डॉ. कुंभारे यांनी १९७३ पासून गडचिरोलीत सेवाभावाने आरोग्यसेवा केलेली आहे, याची माहिती सर्वांना आहे. मी सामाजिक बांधिलकीतून काम करीत आहो, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला अॅड. आखाडे, पंडीत पुडके, श्रीकांत भृगूवार आदी उपस्थित होते.