जहाल माओवादी प्रमिला, अखिलाचे आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Published: July 11, 2024 04:08 PM2024-07-11T16:08:51+5:302024-07-11T16:10:24+5:30

नक्षल चळवळीला पुुन्हा धक्का: १६ लाखांचे होते बक्षीस

Surrender of Jahal Maoist Pramila and Akhil | जहाल माओवादी प्रमिला, अखिलाचे आत्मसमर्पण

Surrender of Jahal Maoist Pramila and Akhil

गडचिरोली: नक्षल चळवळ सोडून आत्मसमर्पण स्वीकारण्याचे सत्र सुरुच असून ११ जुलै रोजी आणखी दोन जहाल महिला माओवाद्यांनी पोलिसांपुढे हजर होणे पसंत केले. प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजुबाई (३६,रा. बोगाटोला (गजामेंढी) ता. धानोरा) व अखिल संकेर पुडो उर्फ रत्नमाला उर्फ आरती (३४,रा.मरकेगाव ता. धानोरा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे १६ लाखांचे बक्षीस होते. प्रमिला व अखिला या दोघीही नक्षल चळवळीत सध्या प्लाटून पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टीम व स्टाफ टीम सदस्य म्हणून काम करायच्या.

त्यांच्या अटकेने नक्षल्यांना आणखी एक धक्का बसला आहे.  प्रमिला ही २००५ मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर भरती झाली व २०११ पर्यंत काम केले. पुढे ती २०११ ते १४ मध्ये वैरागड दलममध्ये सक्रिय होती. नंतर २०१४ ते १५ दरम्यान केकेडी दलममध्ये तिने काम केले. २०१५ मध्ये कंपनी क्र. ४ मध्ये सदस्य पदावर तिची बदली झाली. २०१८ मध्ये तिला प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून बढती मिळाली. २०२२ मध्ये डीके सप्लाय टीम व स्टाफ टीममध्ये बढती होऊ प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून ती कार्यरत होती.  अखिला ही २०१० मध्ये नक्षल चळवळीशी जोडली गेली. टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाल्यावर २०१३ पर्यंत कार्यरत होती. २०१३ नंतर तिची प्लाटून क्र. १५ मध्ये सदस्य पदावर बदली झाली. नंतर ती प्लाटून क्र. ४ मध्ये सदस्य पदावर बदलीने कार्यरत झाली.

२०१५ मध्ये  डीके सप्लाय टीम व स्टाफ टीममध्ये तिने सदस्य म्हणून काम केले. २०१८ मध्ये तिला  डीके सप्लाय टीम व स्टाफ टीममध्ये प्लाटून पार्टी कमिटी सदस्य पदावर पढती मिळाली. 

प्रमिलावर ४०, अखिलावर ७  गुन्ह्यांची नोंद
प्रमिला हिच्यावर ४० गुन्ह्यांची नोंद आहे. यात २० चकमकी, २ जाळपोळ व इतर १८ गुन्ह्यांचा समावेश आहे. अखिलावर ७ गुन्हे नोंद असून यात ४ खून, २ चकमक व इतर १ गुन्ह्याचा समावेश आहे.   महाराष्ट्र सरकारने दोघींवर प्रत्येकी ८ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

Web Title: Surrender of Jahal Maoist Pramila and Akhil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.