८ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला माओवाद्याचे आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Published: July 27, 2024 05:12 PM2024-07-27T17:12:21+5:302024-07-27T17:16:33+5:30

खून, चकमकीत सहभाग : कमांडर पदावर होती सक्रिय

Surrender of Jahal woman Maoist with 8 lakh reward | ८ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला माओवाद्याचे आत्मसमर्पण

Surrender of Jahal woman Maoist with 8 lakh reward

गडचिरोली: माओवाद्यांना सर्व प्रकारचे साहित्य पुरवठा करणारी जहाल माओवादी व कमांडर रिना बोर्रा नरोटे उर्फ ललिता (३६,रा.बोटनफुंडी ता. भामरागड) हिने २७ जुलै रोजी जिल्हा पोलिस व राज्य राखीव पोलिस दलापुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर शासनाचे आठ लाखांचे बक्षीस होते.
 
रिना नरोटे ही २००६ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली होती. २००७ पासून ती पुरवठा टीममध्ये काम करायची. २००७ ते २००८  मध्ये शिवणकला, कापड कटींग व शिलाई यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण तिने घेतले. २००८ ते २०१४ या दरम्यान टेलरिंग टीममध्ये सदस्य पदावर ती कार्यरत होती. २०१४ मध्ये टेलर टीममध्ये कमांडर पदावर तिची बढती झाली.
 

कार्यकाळात तिच्यावर चकमक व खुनाचा गुन्हा नोंद आहे. २०२० मध्ये  पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्याआधी २०१९ मध्ये  नैनवाडी जंगल परिसरात एका निरपराध व्यक्तीच्या खुनात ती सामील होती. विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ बटालियन ९ चे कमांडंट शंभू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मसपर्मण पार पडले.

साडेपाच लाखांचे बक्षीस मिळणार
रिना नरोटे या महिला माओवाद्याच्या अटकेवर आठ लाखांचे शासनाचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर आता तिला साडेपाच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. २०२२ पासून आतापर्यंत  एकूण २३ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
 

Web Title: Surrender of Jahal woman Maoist with 8 lakh reward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.