अखंडित विजेसाठी अभियंत्याला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:42 AM2021-08-17T04:42:17+5:302021-08-17T04:42:17+5:30
गेवर्धा फिडरवर २२ गावे येतात. या फिडरवरून कृषिपंपांना आठ तास विद्युत पुरवठा देण्यात येतो. त्यातच २ तास विद्युत पुरवठा ...
गेवर्धा फिडरवर २२ गावे येतात. या फिडरवरून कृषिपंपांना आठ तास विद्युत पुरवठा देण्यात येतो. त्यातच २ तास विद्युत पुरवठा बिघाड मुळे बंद असतो. त्यामुळे फक्त सहा तास पुरवठा मिळतो. गेल्या १५ दिवसांपासून पाऊस येत नसल्याने २० टक्के लोकांची रोवणी थांबली आहेत. १५ ऑगस्ट राेजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कंत्राटवार, माजी महिला आघाडी संघटिका छाया कुंभारे यांच्या नेतृत्वात विद्युत कार्यकारी अभियंता रवींद्र गाडगे यांना घेराव घालण्यात आला. २४ तास विद्युत पुरवठा सुरू करा, अशी मागणी करण्यात आली. गाडगे यांनी मुख्यअभियंता देशपांडे यांचेशी चर्चा केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अरविंद कंत्राटवार, उपतालुकाप्रमुख यादव लोहंबरे, माजी जि. प. सदस्य सुनंदा आतला, सीमा पारशार, शकुन नंदनवर, कालिदा कडवे, स्वप्नील खांडरे, गोपाल मेश्राम, निकेश लोहंबरे, रवी गायकवाड, आशिष मिश्रा उपस्थित होते.